माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या अंतयात्रेला सुरूवात
28-Dec-2024
Total Views | 68
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या आर्थीक क्रांतीचे जनक अशी ओळख असलेल्या सिंग यांना सश्रू नयनांनी लोकांनी आदरांजली वाहिली. मनमोहन सिंग यांचे पार्थीव काँग्रेसच्या मुख्यालयापासून ते निगमबोध घाटापर्यंत नेण्यात आले. अशातच जमलेल्या लोकांनी " मनमोहन सिंग अमर रहें"नारा दिला. काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आणि नेते यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरकाची निर्मीती करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहं यांनी कॅबिनेट बैठक बोलावत, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी याबाबत संवाद साधला. माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा दुखवटा पाळला जाईल आणि या काळात संपूर्ण भारतात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे.
सिंगापूर देशाने वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!
डॉ.मनमोहन सिंग यांच्या कार्याचा आणि ज्ञानाचा गौरव केवळ देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी केला गेला. मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पदभार स्विकारात, भारताचे नाव उंचावले. त्यांच्या या आणि असंख्य कार्याला मानवंदना देत सिंगापूर देशाने आपला राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष एच.सी. वोंग यांनी डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धंजली वाहिली आहे.