लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल येथील वादग्रस्त असलेल्या शाही जामा मशिदीनजीक पोलीस ठाणे उभारले जाणार आहे. संबंधित पोलीस ठाणे हे मशिदीच्या समोरील मैदानात बांधले जाणार आहे. याबाबत आता प्रशासनाने बांधकामाची सुरूवात करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू केला आहे. अशावेळी कट्टरपंथींनी दगडफेक करत बांधकाम बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
संभलचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीचंद्र यांनी याप्रकरणात लक्ष घातले आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही पोलीस चौकी बांधण्यात येणार असल्याचे सांगितले जात असल्याचे पोलीसांनी सांगितले. एका विशिष्ट समाजाचे लोक ज्याला शाही मशीद मानतात ते हरिहर मंदिर असल्याचे हिंदूंचे म्हणणे आहे. याप्रकरणी हिंदूंनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २४ नोव्हेंबर रोजी सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगितले गेले.
त्यानंतर कट्टरपंथींना हिंदूंवर हल्ले केले होते. एका हल्ल्यात पोलीस अधिकारी जखमी झाले. त्यावेळी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी संभल येथे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे सुमारे १४० दंगलखोरांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ५० हल्लेखोरांना अटक केली असून ९० दंगलखोरांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.