राहुल गांधींना अटक होणार?

असभ्य वर्तनामुळे भाजपकडून एफआयआर दाखल

    20-Dec-2024
Total Views | 113

rg2

नवी दिल्ली : भाजपद्वेषाने पछाडलेल्या राहुल गांधी यांनी संसदीय सभ्यतेला काळीमा फासत भाजपच्या ज्येष्ठ खासदारांना
धक्काबुक्की केली. या धक्काबुक्की मध्ये भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. त्यांना तातडीने रूगणालयात दाखल करण्यात आले. अशातच राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि बनसुरी स्वराज यांनी एफआयआर दाखल केली. भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११७, ११५, १२५,१३१, ३५१ व कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांना अटक झाल्यास किमान २ वर्षांचा कारावास भोगावा लागेल. यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर देखील गदा येऊ शकते. गेल्या वर्षी राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व सुरत उच्च न्यायालयाने रद्द केले होते. राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता, सुरत उच्च न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी ठरवले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या कारवाईला स्थगिती दिली. काँग्रेसच्या खासदारांनी राहुल गांधी यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी या बाबत मत मांडताना म्हटले की संसदेच्या आवाराच जी ही गोष्ट घडली ती अतिशय दुर्देवी आहे. राहुल गांधी यांच्या उद्दधटपणामुळे त्यांनी हे असे कृत्य केले आहेत.

राहुल गांधींवर संसदेत कारवाईचा बडगा!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाची व्हिडीओ एडीट करत बुद्धिभेद केल्याप्रकरणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना विशेषधिकार भंगाची नोटीस बजावली आहे. खासदार दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नोटीस सादर केली. राहुल गांधी यांचे कृत्यं हे संसदीय शिष्टाचाराच्या विरोधात असल्याचा दावा दुबे यांनी केली आहे.
 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121