ट्रम्प सरकारच्या वन बिग ब्युटीफुल विधेयकाचे जगावर पडसाद! अमेरिकेच्या रेमिटन्स धोरणाचा भारतावर काय परिणाम होणार?
09-Jun-2025
Total Views |
वॉँशिग्टन(Impact of Remittance Policy on India): अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'वन बिग ब्युटीफुल विधेयक' अलीकडेच प्रतिनिधी सभागृहात(House of Representative) मांडण्यात आले आहे. त्यात अशी तरतूद आहे, की अमेरिकेत स्थित कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मायदेशी पैश्यांवर जास्तीचा कर लावणे ज्यामुळे जागतिक रेमिटन्स (पाठविलेला पैसा) चा प्रवाह बदलू शकते. दि. २२ मे रोजी, अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाने २१५-२१४ मतांनी हे विधेयक मंजूर केले. सिनेट सभागृहाची सहमती घेऊन, विधेयकाची अंमलबजावणी ट्रम्प कधी पण करू शकतात. या रेमिटन्स धोरणाचा अमेरिकेत आघाडीचा प्राप्तकर्ता असलेल्यापैंकी भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका खंडातील अनेक देशावर विषम परिणाम होईल.
या विधेयकात आउटबाउंड रेमिटन्स ट्रान्सफर( विदेशात पैसा पाठविणे) वर प्रस्तावित ३.५ टक्के कर समाविष्ट आहे. या विधेयकात ग्रीन कार्ड धारकांसारखे कायदेशीर रहिवासी, एच-१बी कर्मचाऱ्यांसारखे तात्पुरते व्हिसाधारक आणि परदेशी कामगारांनी मायदेशी हस्तांतरित करणाऱ्या निधीला लक्ष्य केले आहे.
या रेमिटन्स धोरणाचा भारतावरील परिणाम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारताला अंदाजे १२९ अब्ज डॉलर्स रेमिटन्स मिळाले. या रकमेचा सर्वात मोठा भाग अमेरिकेतील भारतीय कर्मचाऱ्यांकडून येतो. हा प्रस्तावित रेमिटन्स कर भारतातील लाखो कुटुंबांना आधार देणाऱ्या पैसातुन अब्जावधी डॉलर्स वजा करु शकतो. गेल्या १० वर्षांत, भारताच्या एकूण रेमिटन्समध्ये ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण २०१४ ते २०२४ दरम्यान, भारताला जवळजवळ १ ट्रिलियन डॉलर्स ($९८२ अब्ज) फक्त रेमिटन्समध्ये मिळाले आहेत.
अमेरिकेतून भारतात घरगुती वापरासाठी पैसे पाठवण्याचा वाटा असलेल्या राज्यापैंकी केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार हे सर्वाधिक रेमिटन्स प्राप्तकर्त्यांपैकी आहेत .त्यामुळे या रेमिटन्स कराचा परिणाम भारतावर विषम प्रमाणात होईल. यात आयटी, आरोग्यसेवा, वित्त आणि अभियांत्रिकी यासारख्या उच्च-कमाईच्या क्षेत्रांमध्ये भारताचे वर्चस्व असल्यामुळे, अमेरिकेत या क्षेत्रात मोठा उलटफेर होईल, असे आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांकडून मत व्यक्त केले जात आहे.
विधेयकावर इलॅान मस्क यांची टिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॅान मस्क यांच्यात झालेला वाद हा जगजाहिर आहे,मस्क यांनी तर ट्रम्प यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या लैगिंक शोषण आणि तस्करी केलाचा आरोप केला आणि त्याच वादाच्या पार्श्वभूमिवर वन बिग ब्युटीफुल विधेयकवर बोचरी टिका करत मस्क म्हणाले की,"मला वाटते की एक विधेयक मोठे असू शकते किंवा ते सुंदर असू शकते. परंतु मला माहित नाही की ते दोन्ही असू शकते."