मंदिरांकडे पाठ,दर्ग्यांवर चादर! काँग्रेसचे दुटप्पीधोरण जगजाहीर

    10-Dec-2024
Total Views | 47

robert vadra

मुंबई : राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या लोकांना बोल लावणाऱ्या काँग्रेसचे 'सेक्युलर' धोरण उघडे पडले आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारे काँग्रेस आणि गांधी कुटुंबीय, मजारींवर माथा टेकवण्यात धन्यता मानू लागले आहे की काय, असा सवाल आता विचारला जातो आहे. प्रियांका गांधी यांचा वायनाड पोटनिवडणूकीत विजय झाल्यानंतर, त्यांचे यजमान रॉबर्ट वाड्रा यांनी हाजी अली दर्गयावर माथा टेकवला. त्याच वेळेस मशिदींमध्ये सध्या सुरू असलेले सर्वेक्षण कसे अयोग्य आहे यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले.
 
राम मंदीराचे निर्माण म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचे प्रतिक आहे. या सोहळ्याला कोट्यावधी लोक उपस्थित होते. परंतु गांधी कुटूंबीयातील लोकांना रामाचे दर्शन घ्यावेसे वाटले नाही. भक्तीभावाने पाठवलेल्या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला नाही, उलटपक्षी जी माणसे या सोहळ्याला उपस्थित होती, त्यांच्यावर टिकेची झोड उठवली. राम मंदीरचा निकाल टाळण्यासठी याच काँग्रेसचे कपिल सिब्बल सर्वांच्या पुढे होते. अशातच गांधी कुटुंबाचे जावई माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला वेगवेगळ्या दर्ग्यांकडून आमंत्रणं आली आहेत. आपला देश विविधतेने नटलेला आहे, त्यामुळेच आपण जास्तीत जास्त सेक्युलर व्हायला हवे. राजकारण आणि धर्म या दोन गोष्टींना आपण वेगवेगळे ठेवायला हवे. धर्माचे राजकारण कुणीही करू नये. काँग्रेस सरकारच्या काळात शहा बानो प्रकरणाचा निकाल लागला. वक्फ बोर्डाला मिळालेले स्वातंत्र्य ही काँग्रेसचीच देणगी आहे. त्यामुळे धर्म आणि राजकारण या संबंधित गोष्टींची शिकवण ही काँग्रेसला द्यावयास हवी, अशी टिपण्णी समाजमाध्यमांवर केली जात आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121