मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वयंपुनर्विकासाची संकल्पना थेट स्वप्नातून ज्यांनी प्रत्यक्षात उतरवली, ते आ. प्रविण दरेकर यांचा आज वाढदिवस. मजूर संस्थांपासून सुरू झालेले त्यांचे करिअर मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आणि थेट विधानसभा, विधान परिषदेचा आमदार आणि त्यानंतर विधान परिषद विरोधी पक्ष नेता, विधान परिषद गटनेता अशा अनेक कॅबिनेट दर्जाच्या पदांपर्यंत येऊन पोहोचले, त्या गृहनिर्माण चळवळीतील महान नेतृत्वाचा आज जन्मदिवस.
आमच्यासारख्या गृहनिर्मिती क्षेत्रात कार्य करणार्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी प्रविणभाऊ दरेकर म्हणजे अखंड ऊर्जेचा प्रेरणास्रोत. भाऊंच्या स्वयंपुनर्विकास संकल्पनेतून प्रेरणा घेऊन पालघर जिल्ह्यातील अनेक गृहनिर्माण संस्थांना आम्हाला स्वयंपुनर्विकासाचे महत्त्व पटवून देता आले. भाऊंच्या मार्गदर्शनामुळेच सातत्याने सिव्हिल वर्क्स, आर्किटेक्टचरल कन्सलटन्सी ते थेट विकासक म्हणून ‘सातघरे बिल्डकॉन’ फर्म स्वतःची ओळख बनवू शकली. यापुढे देखील भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यामध्ये विविध समाजोपयोगी कार्य करण्याची संधी मिळत राहील, यात शंकाच नाही.
सर्वसामान्यांचा असामान्य नेता, कर्तृत्ववान, प्रतिभावान, धडाडीच्या प्रतिमेचे नेतृत्व, कृतिशील विचारांचा, दूरदृष्टीचा नेता, उत्कृष्ट वक्ता, निरपेक्ष मित्र, प्रेमळ सहकारी अशी अनेक विशेषणे भाऊंच्या ठिकाणी एकवटलेली दिसतात. प्रविणभाऊंना दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या हातून उत्तरोत्तर देशाची, समाजाची अशीच निरंतर सेवा घडो, या सदिच्छांसह प्रविणभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अभियंता राजेश सातघरे,
सातघरे बिल्डकॉन