
बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाव आहे. ते उत्कृष्ट गायक, नट, आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. बालवयातच त्यांच्या सुरेल आवाजामुळे त्यांना "बालगंधर्व" ही पदवी लोकमान्य टिळकांनी दिली. "गंधर्व" म्हणजे दैवी गायक, आणि ते गात असताना रसिक मंत्रमुग्ध होत असे. बालगंधर्व यांचे पूर्ण नाव ' नारायण श्रीपाद राजहंस' होते, त्यांचा जन्म २६ जून १८८८ महाराष्ट्रात सांगली येथे झाला.बालगंधर्व हे मराठी संगीत नाटकांचं सुवर्णयुग असलेले प्रमुख कलाकार होते. त्यांनी अनेक स्त्री भूमिका साकारल्या, कारण त्या काळात महिलांना रंगभूमीवर काम करण्याची परवानगी नव्हती. त्यांची, शारदा, मानापमान, एकच प्याला, स्वयंवर, संगीत मृच्छकटीक ही नाटके अजरामर झाली होती.
१९१३ मध्ये त्यांनी स्वतःची "गंधर्व नाटक मंडळी" स्थापन केली होती. त्यांच्या नाटकांतील गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी संगीत नाटकाला आणि मराठी रंगभूमीला जी सेवा दिली, त्यामुळे त्यांना "मराठी रंगभूमीचा राजा" मानलं जातं. 'बालगंधर्व रंगमंदिर' , पुणे हे नाट्यगृह त्यांच्या सन्मानार्थ बांधण्यात आलं होतं. अनेक चित्रपट, पुस्तके आणि संशोधनातून त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला आहे. १९७७ साली ‘बालगंधर्व’ नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता आणि २०११ मध्ये ‘बालगंधर्व’ (फिल्म - सुबोध भावे मुख्य भूमिकेत) प्रसिद्ध झाला.
बालगंधर्वांना त्यांच्या अद्वितीय कलागुणांच्या गौरवार्थ अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात १९५५ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार त्यांच्या रंगभूमीसाठी च्या योगदानाबद्दल देण्यात आला. "संगीत नाटक अकादमी पुरस्कार " म्हणून तो ओळखला गेला. १९६४ मध्ये भारत सरकारकडून ज्ञान आणि कला क्षेत्रातील अपार योगदानाबद्दल "पद्मभूषण" हा उच्च नागरी सन्मान देण्यात आला. बालगंधर्वांना १९५२ मध्ये पक्षाघात (पॅरालिसिस)चा झटका आला होता, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आणि ते पुढील वर्षांमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बळ झाले. त्यांच्या अवस्थेत सुधारणा न झाल्याने पुढे ते गंभीर आजाराने जखमी झाले आणि जवळपास तीन महिने कोमात होते, ज्यामध्ये त्यांनी शेवटी आपले जीवन संपवले. अखेरीस त्यांच्या दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत पुणे येथे मालवली. तो दिवस होता १५ जुलै १९६७.
रेखा डायस