फिनटेक कंपन्यानी स्वतः च नियामक मंडळाची स्थापना करावी - शक्तिकांत दास
नवी दिल्ली: ' फिनटेक कंपन्यांनी स्वतः चे नियामक मंडळ स्थापन करून फिनटेक क्षेत्राची व्यवस्थितपणे व्यवसाय वृद्धी प्राप्त करावी. २०३० पर्यंत २०० बिलियन डॉलरचा महसूलाचे उद्दिष्ट यानिमित्ताने पूर्ण करता येईल का हे विचारात घ्यायला हवे. ' असे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
तीन दिवसीय ग्लोबल फिनटेक फेस्टिवल मध्ये बोलताना शक्तिकांत दास यांनी हे वक्तव्य केले आहे. ' याखेरीज या इंडस्ट्रीत पारदर्शक कारभार, व्यवहार, अत्यंत स्वच्छ हेतू व नैतिकतेच्या आधारावर ग्राहकांची डेटा प्रायव्हसी जपणे यासाठी फिनटेक प्लेअर्सला प्राधान्यक्रम दिले पाहिजे.' असे यावेळी नमूद केले आहे.
यावेळी फिनटेक इकोसिस्टीम बद्दल बोलताना , ' फिनटेक कंपन्यांनी स्वत: जबाबदार डिजिटल इनोव्हेशनची खात्री केली पाहिजे. रिझर्व्ह बँक गतिमान आणि उत्तरदायी फिनटेक इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक नियामक आणि इतर धोरणात्मक उपाययोजना करत राहील' अशी खात्री यावेळी त्यांनी उपस्थितांना दिली.