मुंबई लोकलच्या महिलांचा 'या' यंत्रणेमुळे प्रवास होणार सुखकर!

    13-Aug-2023
Total Views | 90
 
Talk-back system
 
 
मुंबई : मुंबईत दररोज लाखो महिला लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. यासाठी महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वेने लेडीज कोचमध्ये 199 सीसीटीव्ही कॅमेरे आधीच बसवण्यात आले, मात्र आता EMU लोकल ट्रेनच्या महिला डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॉक-बॅक सिस्टम बसवण्यात आली आहे. यामुळे महिला अडचणीच्या वेळी आणि त्यांना मदत हवी असल्यास पुश बटण दाबून थेट ट्रेन व्यवस्थापकाशी संवाद साधू शकते.
 
 
लोकलमध्ये महिला डब्ब्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याचं किंवा पुरुष चढल्याच्या घटना घडल्या आहेत. इतकंच नाहीतर रात्रीच्या वेळी लोकलमधून प्रवास करतानाही महिलांच्या मनात भीती असते. यामुळे आता रेल्वेकडून महिला प्रवाशांच्या डब्यामध्ये टॉकबॅक सिस्टम लावण्यात आली आहे. यामुळे अडचणीच्या किंवा आणीबाणीच्या काळात महिला अगदी सोप्या पद्धतीने थेट व्यवस्थापकाशी संवाद साधू शकतात.
 
अधिक माहितीनुसार, महिला प्रवाशांना आणीबाणीच्या वेळी पुश बटण सक्रिय करून ट्रेन व्यवस्थापकाशी संवाद साधता येतो. एकूण १५१ ईएमयू रॅकपैकी, ही प्रणाली ८० रॅकमध्ये यशस्वीरित्या बसवण्यात आली आहे. तर उर्वरित युनिट्समध्ये मार्च २०२४ पर्यंत टॉकबॅक सिस्टम बसण्यात येईल.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121