एसबीआयच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी आनंदी बातमी
मुंबई: भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआय ( स्टेट बँक ऑफ इंडिया) ने आणि नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एसबीआयचे रू-पे क्रेडिट कार्डचे युपीआय प्रणालीशी संलग्न करण्याची घोषणा केली.आता एसबीआय क्रेडिट कार्डचे ग्राहक रु -पे क्रेडिट कार्डचा माध्यमातून युपीआय व्यवहार करू शकतील. यासाठी आपले क्रेडिट कार्ड युपीआय बँकेबरोबरच युपीआय करिता रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक असेल.
क्रेडिट कार्डचे खप वाढण्यास बँकेला या निर्णयामुळे हातभार लागेल. जवळपास सगळीकडेच युपीआय स्विकारत असल्याने क्रेडिट कार्ड ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सुविधेचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.