डोंबिवली :सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डोंबिवली पूव्रेतील घरडा सर्कल ते आर. आर. रूग्णालय येथे र्पयतच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामामध्ये रस्त्यांचे खोदकाम न करता डांबरी पृष्ठभागावरच अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग (युटीडब्ल्यूटी)या कॉक्रीटच्या थराचे काम करण्यात येते. या पध्दतीमुळे वेळेची बचत होत असून नागरिकांची होणारी सोय आणि खोळंबा टळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सावजर्निक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीत प्रथमच या तंत्रज्ञानाच्या आधारे काम हाती घेण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालयार्पयत रस्ता कॉक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याचे 13.8 कोटी रुपयांचे काम हाती घेतले आहे. या कामामध्ये अद्यावत अश्या व्हाईट टॉपिंग पध्दतीचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या अद्यावत पध्दतीमुळे नेहमीपेक्षा अंदाजे चाळीस टक्के खर्चात बचत होणार आहे. याशिवाय रस्त्याचे काम करताना सेवावाहिन्या, केबल्स, पाईपलाईन यांचे नुकसान होते. वेळेप्रसंगी त्यांचे स्थालंतरण करावे लागते. पण या अद्यावत पध्दतीमुळे स्थालंतरण टाळता येते.
अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग म्हणजे काय?
अल्ट्रा थीन व्हाईट टॉपिंग म्हणजेच बांधकाम क्षेत्रत ज्याला युटीडब्ल्यूटी तंत्रज्ञान असे संबोधले जाते. या तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता बांधकाम केले जाते. या पध्दतीत डांबरी रस्त्याचे खोदकाम करण्याची आवश्यकता भासत नाही. परिणामी वेळेची बचत होते.