IPL Schedule 2023: तीन वर्षांनतर पुन्हा होणार 'हा' बदल

    17-Feb-2023
Total Views | 160

Shivsena



मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या IPL Schedule 2023 सोळाव्या सिझनचे शेड्यूल शुक्रवारी जाहीर झाले आहे. डिफेंडींग चँपियन गुजरात टाइटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान ३१ मार्च रोजी पहिला सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार असून २८ मे रोजी फायनल खेळवली जाणार आहे. तीन वर्षांनतर होणार होम-अवे फॉर्मेटमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.
 
१८ डबल हेडर असणार
 
या समान्यांमध्ये १८ डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. म्हणजेच एका दिवशी दोन सामने प्रेक्षकांना पहाता येणार आहेत. यावेळी पहिला सामना दुपारी ३.३० वाजता तर दुसरा सामना सायंकाळी ७.३० वाजताी खेळवला जाणार आहे. ३१ मार्च रोजी गुजरात आणि चेन्नई दरम्यान पहिला सामना खेळवला जाणार आहेत. त्यानंतर २ एप्रिल रोजी दोन डबल हेडर असणार आहेत.
 
- १ एप्रिल रोजी पंजाब आणि कोलकाता दरम्यान पहिला लखनऊ-दिल्ली दरम्यान दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
 
- २ एप्रिल रोजी सनराइजर्स-राजस्थान दरम्यान पहिला आणि बंगळुरु-मुंबई दरम्यान दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
 
- ८ एप्रिल रोजी दोन तोडीस तोड मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकींग्ज दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे.

IPL Schedule 2023 ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.  
 
 
५८ दिवसांत होणार ७४ सामने
 
५८ दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्रामात एकूण १० संघांमध्ये तब्बल ७४ सामने होणार आहेत. प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे यापैकी सात सामने आपल्या मैदानात तर उर्वरित सात सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात खेळवले जातील. १० संघामध्ये ७० सामने लीग स्टेज होणार आहेत. लीग स्टेजनंरतर पॉईंट टेबलवर पहिले चार संघ प्ले-ऑफसाठी क्वालिफाय करणार आहेत.
 
या १२ शहरांमध्ये होणार सर्व सामने
 
एकूण ७४ सामने हे विविध १२ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. तसेच गुवाहाटी आणि धर्मशाला स्टेडीयमवरही सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल संघांच्या उदा. मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपुर, बंगळुरू, लखनऊ, हैदराबाद, दिल्ली, मोहाली आणि कोलकाता अशा १० शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत.
 
तीन वर्षांनतर होणार होम-अवे फॉर्मेटमध्ये होणार सामने
 
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे २०२० मध्ये आयपीएलचा अर्धा रणसंग्राम भारतात तर उर्वरित UAE मध्ये करावा लागला होता. २०२१ मध्येही UAE मध्येच हे सामने खेळवण्यात आले. गतवर्षी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरातील चार शहरांमध्येच सामने खेळवण्यात आले होते. त्यानंतर कोलकाता आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफ सामने खेळवले होते. यंदा २०१९ सिझनमध्ये होम अवे फॉरमॅटच्या प्रमाणेच हे सामने खेळवले जाणार आहेत.
 
गुजरात टायटन्स ठरला होता विजेता!
 
२०२२ दरम्यान गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायटन्स दरम्यान संघाने पहिल्यांदाच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात विजयश्री खेचून आणला होता. हार्दिक पंड्याच्या संघाने राजस्थान रॉयल्सला फायनलमध्ये सात विकेट्सने विजय मिळवला होता. त्यापूर्वी २००८ मध्ये आयपीएलमध्ये पहिल्यांदा आलेल्या राजस्थानने हा किताब पटकवला होता.
 
 
मुंबई-चेन्नई सर्वात यशस्वी संघ!
 
मुंबई इंडियन्स या स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. या संघाने पाच वेळा आयपीएलचा किताब पटकवला आहे. तर चेन्नई सुपरकिंग्स या बाबतीत क्रमांक दोनवर आहे. सीएसकेने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चारवेळा आयपीएल चषक पटकावला आहे. कोलकाताने दोनदा हैदराबाद, राजस्थान, गुजरात आणि डेक्कन चार्जर्स हैदराबादने ने एक एक वेळा आयपीएल चषक आपल्या नावे केला आहे.


 
 
असं आहे यंदाचं आयपीएल वेळापत्रक!




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121