होमियोपॅथीवर होणारी टीका आणि सत्य परिस्थिती

    11-Dec-2023
Total Views | 144
Article on Homeopathy Treatment

होमियोपॅथी औषधांवर एक नेहमी केली जाणारी टीका म्हणजे, होमियोपॅथीच्या छोट्या गोळ्यांमध्ये काहीही शक्ती नसते किंवा असा गैरसमज पसरवण्यात येतो की, होमियोपॅथीची औषधेही ’placebo effect’ची असतात, तर असे काहीही नसते. होमियोपॅथीची औषधे ही संपूर्णपणे नैसर्गिक असून, निसर्गात मिळणार्‍या व सर्व औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टींपासून ही औषधे तयार केली जातात.

औषधे बनवण्याची जी पद्धत आहे, ती संपूर्णपणे नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असते. होमियोपॅथीच्या औषधांमध्ये अत्यंत सूक्ष्म प्रमाणात औषधी तत्वे साठवली जातात, जणूकाही अणुबॉम्बप्रमाणेच यांची रचना होते. जसे अणुबॉम्बमध्ये अणूचे अणूशी घर्षण होऊन प्रचंड ऊर्जा तयार होते व ती उत्सर्जित केली जाते, त्या ऊर्जेमध्ये प्रचंड रचनात्मक अशी शक्ती सामावलेली असते. याच अभ्यासाला ‘नॅनो तंत्रज्ञान’ असे म्हणतात. तसेच जेव्हा होमियोपॅथीची औषधे ’trituration’ व 'succusion method’ने बनवली जातात. त्यात औषधाच्या अणूंचे एकमेकांवर घर्षण होऊन प्रचंड ऊर्जा असलेले औषध तयार होते. जरी लहानशा गोळ्या दिसत असल्या, तरी त्यामध्ये खूप ऊर्जा सामावलेली असते. यालाच ‘नॅनो तंत्रज्ञान’ असे म्हणतात.

होमियोपॅथीची औषधे व मात्रा बनविण्याच्या प्रक्रियेला ’Drug Dynamisation’ किंवा ‘पोटेंटायझेशन’ असे म्हणतात. या ’Drug Dynamisation’च्या प्रक्रियेमध्ये औषधी सौम्य करून त्यावर ती जोराने हलवली जातात. आता या प्रकारावर अनेक टीकाकार व तथाकथित ज्ञानी लोक आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करताना सांगतात की, ‘होमियोपॅथीक औैषधे म्हणजे नुसतेच पाणी असते.’ असे विधान करून एकतर ते स्वत:चे अज्ञान प्रकट करत असतात किंवा कुठेतरी त्यांचा ’षेेश्रळीह शसे’ डोकं वर काढत असतो. जर अशा अज्ञानी लोकांनी डॉ. हॅनेमान यांचे ‘ऑरगॅनॉन’ कुठलाही पूर्वग्रह दूषित मन न ठेवता वाचले, तर त्यांना या औषधांची खरी उपयुक्तता व सत्यता लक्षात येईल.

डॉ. मार्टिन चॅप्लिन हे एक आदरणीय व प्रतिथयश असे ब्रिटिश प्राध्यापक आहेत, जे जगभरातील जलतज्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी नेहमीचे साधे पाणी व होमियोपॅथीची औषधे असलेले पाणी यांची वैज्ञानिक तपासणी केली. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, होमियोपॅथीक औषधे असलेल्या पाण्याचे गुणधर्म आणि साध्या पाण्याचे गुणधर्म हे पूर्णत: भिन्न आहेत आणि हे त्यांचे अनुमान ज्यात त्यांनी जवळपास २०० संदर्भ दिले आहेत, जे पाण्याच्या वैज्ञानिक संशोधनाशी निगडित आहेत. (chaplin २००९)

सध्या होमियोपॅथीची जी औषधे औषधांच्या दुकानात उपलब्ध आहेत, ती फिजियोलॉजिकल डोसवर बनवलेली आहेत. सूक्ष्मतम औषधीकणांचा शरीरातील ऊर्जेवर परिणाम दिसून येतो, हे अनेक प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. म्हणूनच होमियोपॅथीची औषधे ही नुसती थेअरी नसून प्रत्यक्षात सिद्ध झालेली औषधे आहेत व सत्य पडताळूनच व सत्याच्या कसोटीवर खरी उतरलेली औषधे आहेत. त्यामुळे होमियोपॅथीची औषधे ही नुसते पाणी वा नुसता ’placebo effct’ नसून, औषधी गुणधर्म असलेले व सूक्ष्मतम अशा अणूंमध्ये ऊर्जा साठवलेले एक शक्तीशाली औषध आहे. याच बाबतीत आपण पुढील भागांत माहिती जाणून घेऊया. (क्रमश:)

डॉ. मंदार पाटकर 
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६
अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121