मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडण्याचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने ३ डिसेंबर २०२१ रोजी दिले होते. मात्र, त्यावर स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता ते रिसॉर्ट पाडण्याचं काम या सरकारमध्ये होणार असल्याचं सोमय्यानी म्हटलंय. अनिल परब यांनी हे रिसॉर्ट नियमांचे उल्लंघन करून बांधल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर हे तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आले. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सोमय्यांनी केली होती.
किरीट सोमय्या म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या आदेशाचे आम्ही पालन करणार. रिसॉर्ट तोडण्याचा आदेश ३ डिसेंबर २०२१ रोजी उद्धव ठाकरे सरकारने दिला होता. रत्नागिरी न्यायालयाने आता ते पाडण्याचं काम आता शिंदे सरकार करणार आहे. याआधी त्यावर स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता ते रिसॉर्ट पाडण्याचं काम या सरकारमध्ये होणार आहे." असं सोमय्या म्हणाले.