शिंदेंचे वकील आणि सुनील प्रभू यांच्यात व्हीपवरून खडाजंगी!
23-Nov-2023
Total Views | 150
मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधिमंडळात शिवसेनेच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी करत आहेत. दरम्यान, दोन्ही गटांमध्ये सध्या व्हीपवरुन खडजंगी सुरु आहे. जे संपर्कात होते त्यांना त्या त्या ठिकाणी जाऊन व्हीप देण्यात आला, तर जे संपर्कात नव्हते त्यांना फोन करून किंवा ईमेलद्वारे व्हीप बजावला असल्याचे सुनील प्रभू यांनी म्हटले आहे.
तसेच विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी सुनील प्रभूंना तुम्ही जितकं योग्य उत्तर द्याल तितकं रेकॉर्ड करणं सोपं जाईल, असे म्हटले आहे. तर सुनील प्रभूंनी मी पुर्ण सहकार्य करेन यात शंकाच नाही, असे म्हटले आहे. यावर तुम्ही किती सहकार्य करता हे मी सभागृहात पाहिले आहे, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाच्या वकिलाकडून सुनील प्रभूंना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येत आहे. याशिवाय सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करणारे पत्र विधानभवनाला लिहीले आहे. यामध्ये विधानसभा अध्यक्ष शिंदे गटाला झुकतं माप देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.