महादेव अॅप घोटाळ्यातून किती पैसे मिळाले? पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल!
13-Nov-2023
Total Views |
छत्तीसगड : मुंगेली येथे विजय संकल्प महारॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या भूपेश बघेल सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंगेलीमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहिल्या टप्प्यातच काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यांनी पराभव स्वीकारला आहे. हीच वेळ आहे हे काँग्रेसला समजले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी दारूबंदीसह भ्रष्टाचारावर काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना महादेव अॅपचा मुद्दाही उपस्थित केला.तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने माता-भगिनींना दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र काँग्रेसने महिलांचा विश्वासघात केला. काँग्रेसने दारूबंदी केली नाही तर दारू घरपोच देण्याची व्यवस्था केली.
भ्रष्टाचारावर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला कोंडीत पकडले आणि काँग्रेसच्या महादेव अॅप बेटिंग घोटाळ्यातून मुख्यमंत्र्यांना किती पैसे मिळाले? इतर काँग्रेस नेत्यांना किती संपत्ती मिळाली?, असा सवाल ही मोंदींनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “मला काँग्रेसला काही प्रश्न विचारायचे आहेत. महादेव बेटिंग अॅप घोटाळा ५०८ कोटी रुपयांचा असून तपास यंत्रणांनी या प्रकरणात मोठी रोकड जप्त केली आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा जवळचा सहकारीही तुरुंगात आहे. यात मुख्यमंत्र्यांना किती पैसे मिळाले हे काँग्रेसने उघड करावे? दिल्ली दरबारात किती पैसे पोहोचले? , अशी टीका ही मोदींनी केली.
महासमुंद में उमड़ा ये विशाल जनसमूह इस बात का साक्षी है कि छत्तीसगढ़ की जनता अपने वोट की ताकत से प्रदेश में सत्ता परिवर्तन का संकल्प ले चुकी है। https://t.co/hR4elnYP5C
याशिवाय पीएससी घोटाळ्याबाबतही पंतप्रधान बोलले.रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हजारो तरुणांना कोणत्या सूत्रानुसार बाहेर काढले?काँग्रेस नेत्यांची मुले कोणत्या गणिती सूत्रानुसार भरती झाली?, असा प्रश्न विचारत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. यासोबतच छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारच्या बाहेर पडण्याची उलटी गिनती सुरू झाल्याचे पीएम मोदी म्हणाले. येथील काँग्रेस सरकारने १५ वर्षे तुम्हाला लुटले, आता त्यांच्या जाण्याची वेळ आली आहे. छत्तीसगडमधील आदिवासी, गरीब आणि मागासलेले लोक काँग्रेसला निरोप देण्यासाठी उत्सुक आहेत , असे मोदी म्हणाले.