मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bharat Mata Kerala News) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केरळ येथील राजभवनात एक संतापजनक प्रकार घडला आहे. येथे आयोजित एका सरकारी कार्यक्रमात 'भारत माता'चे चित्र ठेवण्यात आले होते. मात्र डाव्या आघाडीच्या (LDF) सरकारच्या डोळ्यांना दुखावले आणि सरकारने हे चित्र काढून टाकण्याबाबत भूमिका घेतल्याचे निदर्शनास येतेय. याशिवाय, कृषी मंत्री पी. प्रसाद आणि शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी कार्यक्रमावर या कारणास्तव बहिष्कार टाकल्याचेही पाहायला मिळाले.
हे वाचलंत का? : आशाताई भोसले यांचे सरसंघचालकांना पत्र; रेशिमबागेत राहणार होत्या उपस्थित पण...
पिनारायी विजयन यांच्या सरकारमधील दोन मंत्र्यांनी स्टेजवरून 'भारत माता'चे चित्र हटवण्याचा आग्रह धरला. कृषी मंत्री पी. प्रसाद म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित प्रतिमा असलेले हे चित्र स्वीकारले जाणार नाही. परंतु राज्यपालांनी ते मान्य केले नाही. सरकारने आपली मानसिकता उघड करत राजभवनातील कार्यक्रम सोडून दिला आणि त्याचे अधिकृत कार्यक्रम सचिवालयातील दरबार हॉलमध्ये हलवले. दुसरीकडे, राज्यपालांनी 'भारत माते'च्या चित्रासमोर एकटेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची प्रतिष्ठा राखली. हे प्रकरण केरळ सरकारच्या राष्ट्रीय एकता आणि संवैधानिक मूल्यांप्रती असलेल्या वचनबद्धतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.