बंगळुरू चेंगराचेंगरी – आरसीबीचे दोन वरिष्ठ अधिकारी अटकेत

    06-Jun-2025
Total Views |

Bengaluru stampede Two senior RCB officials arrested
 
नवी दिल्ली:  बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चे दोन वरिष्ठ अधिकारी देखील आहेत.
 
सीसीबी गुन्हे उपायुक्त डीसीपी अक्षय यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या वेळी कारवाई करण्यात आली. निखिल, किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर नोंदवताच निखिलने मुंबईला जाण्याची तयारी केली होती. त्याला पहाटे ३.३० च्या सुमारास केम्पेगौडा विमानतळावर अटक करण्यात आली. डीएनए स्टाफ सदस्य सुमंत, सुनील आणि किरण यांनाही अटक करण्यात आली. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमाचे पर्यवेक्षण सुमंत, सुनील आणि किरण करत होते.
 
या घटनेत २५ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. पोलिस सध्या अटक केलेल्या लोकांची चौकशी करत आहेत. अटक केलेल्या चारही जणांना सीआयडीकडे सोपवले जाईल असे सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून जबाब नोंदवून आरोपींना न्यायालयात हजर करण्याची अपेक्षा आहे.