चेंबूरला अनुसूचित विद्यार्थ्यांसाठी आयटीआय

    31-Oct-2023
Total Views | 42

iti

मुंबई :
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर येथे अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला-मुलींसाठी आयटीआय प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यास ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे आयटीआय सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग यांच्या सहकार्याने सुरु करण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती, नवबौद्धांच्या मुला-मुलींसाठी मुंबई विभागात शासकीय उच्च स्तर आयटीआय कमी प्रमाणात आहेत. या मुलांना रोजगारक्षम करून उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी हे आयटीआय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
यामध्ये १० ट्रेड्सच्या (व्यवसाय अभ्यासक्रम) प्रत्येकी २ तुकड्या याप्रमाणे २० तुकड्या सुरु करण्यात येतील. यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर अशी ३६ पदे आणि बाह्य यंत्रणेद्धारे ८ पदे अशा ४४ पदांना आणि त्यासाठी येणाऱ्या ५ कोटी ३८ लाख ८८ हजार इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

अग्रलेख
जरुर वाचा
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण

राज्याची राजधानी मुंबई आण‍ि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आण‍ि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121