युनियन बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर. बँकेला Q२ इयर ऑन इयर बेसिसवर ९०% निव्वळ नफा
बँकेच्या एकूण व्यवसायात ९.२४ टक्यांने वाढ
मोहित सोमण
मुंबई: युनियन बँक ऑफ इंडियाने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर हे निकाल प्रस्तुत करण्यात आले आहेत. सप्टेंबर ३०, २०२३ पर्यंतच्या तिमाहीत कंपनीला गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मोठा नफा झाला असून इयर ऑन इयर बेसिसवर तब्बल ९० टक्के निव्वळ नफा बँकेला झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर कासा ठेवींमध्ये देखील वाढ झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत बँकेच्या खात्याची रक्कम ११,३७, ६२८ कोटींच्या घरात गेली आहे. बँकेने रिटेल,अँग्रीकल्चर, एमएसएमई उत्पन्नात देखील वाढ दाखवली आहे. रिटेल,अँग्रीकल्चर, एमएसएमई सेक्टरमधील कर्ज वाटपात एकत्रितपणे इयर ऑन इयर बेसिसवर १४.६२% वाढ झाली आहे. १४.६८% वाढ रिटेल क्षेत्रात, १५.०४ टक्के वाढ अँग्रीकल्चर लोन व एमएसएमई क्षेत्रातील कर्जवाटपात १४.०३ टक्के वाढ झाली आहे.
बँकेच्या एकूण व्यवसायात ९.२४ % वाढ झाली असून ग्रॉस अँडव्हान्स मध्ये ९.५०% व एकूण ठेवींची संख्या ९.०४ टक्यांने वाढ झाली आहे. बँकेचा एकूण व्यवसाय १९८४,८४२ पर्यंत झाला आहे.
विशेष म्हणजे एनपीए मध्ये मोठी घट झाली आहे.२०७ बेसिस पॉईंटसने कमी होत ६.३८ टक्यांपर्यंत एनपीए खाली आल्याचे बँकेने आपल्या निकालात म्हटले आहे. नेट एनपीए १३४ बेसिस पॉईंटसने खाली येत १.३० टक्यांपर्यंत खाली आले आहे. व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली असून आर्थिक वर्ष २३ च्या तिमाहीतील तुलनेतील १९६८२ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २४ च्या तिमाहीत २४४७८ कोटी रुपये इतके उत्पन्न वाढले आहे. व्याजावरील खर्चात देखील वाढ झाली.आर्थिक वर्ष २३ च्या खर्चातील ११३७७ कोटी रूपयांवरून २४ मधल्या तिमाहीत १५४६१ रूपये इतकी वाढ झाली आहे.ऑपरेटिंग नफ्यात मागील वर्षाच्या ६५७७ कोटींच्या तुलनेत ७२२१ कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे.
याशिवाय कंपनीने महिला सक्षमीकरणासाठी व समाज सबलीकरणासाठी देखील उपक्रम हाती घेतले आहे. नुकतीच युनियन बँक ऑफ इंडियाने महिलांचा हॉकी संघ बनवून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले होते. सरकारच्या आर्थिक समावेशक धोरण राबविताना देखील बदलत्या वातावरणात कंपनीने आपली आर्थिक धोरणात लवचिकता आणली आहे.
विशेषतः रिन्यूएबल एनर्जी, युनियन ग्रीन मिल्स सारख्या भविष्यातील क्षेत्रात उद्योजकांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले. रिन्यूएबल एनर्जीला २२९९८ कोटी रूपये व युनियन ग्रीन मिल्स या प्रवर्गाला ३१६ कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप बँकेतर्फे करण्यात आल्याचे बँकेने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत सरकार प्रायोजित विमा योजनेत या तिमाहीत नवीन ३.५१ लाखांची नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेतून २८.३७ लाखांची नवीन नोंदणी या तिमाहीत झाली. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २३ पर्यंत नवीन २.८७ कोटींची नवीन खाती उघडण्यात आली आहे. अटल पेंशन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील २.१८ लाख नव्या कर्मचाऱ्यांची नोंदणी बँकेने केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी युनियन नारी शक्ती योजनेत युनियन बँकेने १३७६ कोटींचे अर्ज स्विकारले आहे आहेत.
सध्या देशभरात सरकारी उपक्रम संचलित युनियन बँकेच्या एकूण ८५२१ शाखा असून १००१४ एटीएम मशिन कार्यरत आहेत.