बरखा दत्त पोहोचली युद्धभूमीवर; समर्थन मात्र हमासलाच!
16-Oct-2023
Total Views | 147
मुंबई : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप सुरुच आहे. भारतातील पत्रकार बरखा दत्त या सध्या इस्त्रायलमध्ये हे युद्ध कव्हर करत आहेत. परंतू, शस्त्रुंना माहिती पुरवत असल्याचा बरखा दत्त यांचा इतिहास आहे. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
कारगिल युद्ध आणि मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लाइव्ह रिपोर्टिंगच्या नावाखाली त्यांनी असेच कृत्य केल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद हा बरखा दत्तची यांची प्रशंसा करतो. त्यामुळे इस्त्रायलला अशा पत्रकारांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच त्यांच्या कामावर लक्ष ठेवायला सांगितले जात आहे.
२६/११ च्या हल्ल्यादरम्यान, ओबेरॉय ट्रायडंटमध्ये कोणीही ओलीस नसल्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यावेळी बरखा दत्त यांनी ओबेरॉयच्या प्रमुखाला फोन करत इमारतीत १०० किंवा त्याहून अधिक लोक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही गोष्ट दहशतवाद्यांसह सर्वांनाच कळली होती. विशेष म्हणजे त्यांनी फोन केल्याचे त्या मान्यदेखील करतात.
यासोबतच कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडे काश्मीर खोऱ्यात आणखी एक पुलवामासारखा दहशतवादी हल्ला करण्याचा किंवा भारतभर काहीतरी मोठा प्रभावशाली दहशतवादी हल्ला करण्याचा एकच पर्याय असल्याचे वक्तव्यही बरखा दत्त यांनी केले होते. या सगळ्यानंतर त्या आता इस्त्रायलमध्येही रिपोर्टिंग करण्यासाठी गेल्या आहेत. त्यामुळे इस्त्रायलच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.