"सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु"; बेंजामिन नेतन्याहूंचा हमासला गर्भित इशारा

    10-Oct-2023
Total Views |

Benjamin Netanyahu


मुंबई : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलनेही बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. हमाससोबत आता शेवटचे युद्ध करण्याचा इस्त्रायलने निर्णय घेतला आहे. त्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीला लागून असलेल्या सर्व भागांचा ताबा घेतला आहे.
 
इस्त्रायलच्या सैन्याने गाझा पट्टी सील करुन ताब्यात घेतली आहे. यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्त्रायलच्या दुश्मनांना अनेक दशके लक्षात राहील असा धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, "आम्हाला हे युद्ध नको होते. परंतू, अत्यंत क्रूर पद्धतीने ते आमच्यावर लादले गेले. पण जरी इस्त्रायलने हे युद्ध सुरु केले नसले तरी इस्त्रायल ते नक्कीच संपवेल. इस्रायलवर हल्ला करून हमासने ऐतिहासिक चूक केली आहे, असे ते म्हणाले.
 
तसेच आम्ही हमास आणि इस्रायलच्या इतर शत्रूंना असा धडा शिकवू जो ते अनेक दशके विसरणार नाहीत, असेही ते म्हणाले. निर्दोष इस्रायलींवर हमासने केलेले क्रूर हल्ले मनाला चटका लावणारे आहेत. अनेक कुटुंबांना त्यांच्या घरात मारुन टाकणे, अनेक महिला, मुले आणि वृद्धांचे अपहरण करणे हे अगदी क्रुर आहे, असे ते म्हणाले.
 
दरम्यान, इस्रायलच्या सुरक्षा दलांनी गाझावर हल्ले करणे सुरू केले आहेत. आत्तापर्यंत इस्रायली सुरक्षा दलांनी गाझामधील १२०० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये सुमारे ६०० पॅलेस्टिनी दहशतवादी मारले गेले आहेत. इस्रायलने हल्ल्यानंतर ४८ तासांत ३ लाखांहून अधिक राखीव सैनिकांना परत बोलवले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत.
 
त्याचवेळी इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने म्हटले आहे की, जर इस्रायलने आणखी हल्ले केले तर ते ओलिस ठेवण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांची एकामागून एक हत्या करण्यास सुरुवात करेल. तसेच या हत्या टीव्हीवरही दाखवणार असल्याचे हमासचे प्रवक्ते अबू उबैदा यांनी सांगितले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121