उल्हासनगरात दहशतवाद विरोधी पथकाच्या छाप्यात ४ बांगलादेशी अटक!
22-Jan-2023
Total Views | 76
18
उल्हासनगर: मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने उल्हासनगरात मारलेल्या छाप्यात चोरीछुपे राहणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॅम्प नंबर ४ मधील कृष्णानगर परिसरात काही बांगलादेशी अनधिकृतरित्या वास्तव्य करत असून त्यांच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याची माहिती मुंबई दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.त्यानुसार पथकाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कृष्णानगर परिसरात छापा टाकून पोलिसांनी चार बांगलादेशीना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे खलील मंडल,लिटन शेख,नाचिमा खातून मंडल,शुकरअली शेख असून त्यापेक्षा एका आरोपीकडे बांगलादेशची कागदपत्रे मिळून आली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.याप्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे)धनंजय कापरे करत आहेत.