अधीर रंजन चौधरी पुन्हा बरळले, राष्ट्रपतींचा ‘राष्ट्रपत्नी’ उल्लेख
राष्ट्रपतींचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख;
भाजपची माफीची मागणी
28-Jul-2022
Total Views | 63
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणी यांनी गुरुवारी दि. २८ जुलै रोजी संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेसच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना “राष्ट्रपत्नी” म्हणून संबोधल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली.
“तुम्ही सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडरचा अपमान केल्याबद्दल दोषी आहात, आदिवासी नेत्याचा अपमान केल्याबद्दल तुम्ही दोषी आहात…आदिवासीला दिलेला सन्मान काँग्रेस पक्ष टिकू शकत नाही, एका गरीब आदिवासी महिलेची भारताची राष्ट्रपती होणे पचनी पडू शकत नाही, "भाजप खासदारांनी सभागृहात विरोध केला असतानाही लोकसभेत इराणी म्हणाल्या. या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या विरोधामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही तहकूब करण्यात आली.