मानसिक आजार आणि होमियोपॅथीची व्याप्ती

    07-Jun-2022
Total Views | 66

homeopathy

 
निरोगी मनाचे गुणधर्म जाणून घेतल्यानंतर आपल्याला आजारी मनाचे गुणधर्म जाणणे हे फार सोपे जाते. कुठल्या पातळीवर माणसाचे मन आजारी झाले आहे, याचा तज्ज्ञांना अंदाज बांधता येतो. नुसत्या मानसिक लक्षणांपेक्षा शारीरिक व मानसिक स्थितीला फार महत्त्व असते. डॉ. हॅनेमान यांनी ‘ऑरगेनॉन ऑफ मेडिसीन’मध्ये लिहून ठेवले आहे की, ’this holds good to such an extent, that the state of the disposition of the patient often chiefly determines the selection of the homoeopathic remedy, as being a decidedly characteristic symptom which can least of all remain concealed from the accurately observing physician.’ यावरून हेच दिसून येते की, मानसिक आजारांचाच नव्हे, तर इतर आजारांचा अभ्यास व उपचार करत असताना शारीरिक व मानसिक स्थिती अभ्यासणे फार गरजेचे असते.
 
 
शरीरातील विविध संस्था व अवयवांची लक्षणे व मानसिक लक्षणे हे दोन्ही एकाच मूलतत्त्वातून म्हणजेच चैतन्यशक्तीकडून येणारी लक्षणे असतात. त्यातील मानसिक लक्षणे ही एक प्रकारचा ‘पॅटर्न’ तयार करत असतात, ज्यामध्ये सद्य:परिस्थितीस लक्षणे-फॅक्ट्स किंवा ’ऊशर्श्रीीळेपी’ म्हणजे भ्रमित लक्षणे असू शकतात.
 
 
डॉ. हॅनेमान यांनी वर दिलेल्या परिच्छेदात स्पष्टपणे सांगितले आहे की, रुग्णाची मानसिक स्थिती म्हणजेच ‘स्टेट’ पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. मानसिक लक्षणे जर अभ्यासायची म्हटली, तर प्रत्येक केसमध्ये अनेक मानसिक लक्षणे आढळून येतात. अगदी शेकड्याने लक्षणे दिसून येतात. परंतु, ही मानसिक लक्षणे कोणत्या मानसिक स्थितीमधून आली आहेत, हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे असते. म्हणूनच ‘मेंटल सिम्प्टम्स’पेक्षा ‘मेंटल स्टेट’ही फार महत्त्वाची असते. कारण, लक्षणे ही १०० असू शकतात. परंतु, स्थिती किंवा ‘स्टेट’ ही एकच असते व त्यापासूनच सर्व लक्षणे निघत असतात.
 
 
मानसिक रोग म्हणजेच ‘मेंटल डिसिज’वरती उपचार करत असताना हा रोग म्हणजे काय, हे जाणणे महत्त्वाचे आहे.
‘डिसिज’ म्हणजे ‘डिस्-ईज्’ (ऊळी-शरीश) म्हणजेच शरीराची व मनाची सहजता निघून जाणे, ही एक असहज स्थिती असते. मनाची ही असहजता ही एक स्थिती असून लक्षणे दिसण्याच्या कितीतरी अगोदर ही स्थिती बनत असते. ही सहजता मग विविध लक्षणे दर्शवत राहते.
 
 
सर्वसाधारण पातळीवर (जनरल लेव्हल) दिसणारी ही अस्वस्थता मूळची त्या माणसाच्या ऊर्जेमध्ये येणारी म्हणजेच चैतन्यशक्तीमध्ये येणारी अस्वस्थता असते. चैतन्यशक्ती खालावल्यावर आजाराची लक्षणे माणसाच्या शरीरावर व मनावर दिसून येतात. ही चैतन्यशक्ती खालावण्यामागे माणसाची शारीरिक व मानसिक स्थिती (state of disposition of mind ) हे मुख्यत्वे कारणीभूत असतात. त्याच्या पुढे आपण याचे मानसिक स्थितीचा थोड्या विस्ताराने अभ्यास करणार आहोत.
 
 
- मंदार पाटकर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121