असली हूं मैं असली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2022   
Total Views |

ayodhya
 
 
 
असली आ रहा हैं, नकली से सावधान’ म्हणत लोक माझ्या स्वागताला उभी आहेत. मी असा या खुल्या गाडीतून सगळ्यांना हात जोडेन. नाही... नाही... हात जोडू की सोनिया मॅडमसारखा हात दाखवून टाटा करू... हं! ते नंतर ठरवतो. पण मग हातात रूद्राक्षाची माळ आणि अंगावर भगवी शाल घ्यायला हवी का? वेष ठरवायला हवा. हो! त्याची तयारी करायला हवी. दिसले पाहिजे, शोभले पाहिजे की, आम्ही अयोध्यावारी करत आहोत म्हणून... मी अशी अयोध्यावारी करणार आणि त्याची चर्चा देशभर आणि सगळ्या ‘न्यूज चॅनेल’वर चर्चा होणार. ‘देश का नेता कैसन बा?’ असा आवाज सगळीकडून येतोय. (मी अयोध्येत आहे ना! म्हणून अशी भाषा)
 
 
 
 
 
 
वा...वा! आणखीन स्वप्न पाहतो, अयोध्येत रामललांचे दर्शन घेतले की मग झाले. लोक मलाच खरा हिंदुत्ववादी नेता समजणार. मग काय सगळे हिंदू एकजात आम्हालाच मतं देणार! ‘व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!’ ते मोदी, ते योगी नाही... नाही... अख्खीच्या अख्खी भाजप मला कळतही नव्हते तेव्हापासून ‘मंदिर वही बनाएंगे, रामलला हम आयेंगे’ म्हणायचे. ते सत्तेत आले. त्यांनी मंदिराचा प्रश्न सोडवला. लोकांना सॉलिड ‘अपील’ झाले. त्यामुळेच राज काकाने, पण अयोध्येला जायचे ठरवले. रोहित पवारांनी पण जायचे ठरवले. मग मी कसा मागे राहू? त्यामुळे मी अयोध्येला जाण्याआधीच स्वप्न पाहतो. काय म्हणता, तिथे जाऊन असे काय करणार आहे मी? माझ्या अयोध्यावारीत लोकांना ‘इंटरेस्ट’ नाही? पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेताना मंदिरात मी अर्ध्यातून बाहेर आलो? जाऊ द्या. लोकांची स्मरणशक्ती शून्य आहे, असे आमचे सध्याचे काका आजोबा म्हणजे पवारसाहेब आणि संजूकाका आणि बाबाही म्हणतात. त्यामुळे लोकांना काही आठवणार नाही. काय म्हणता, राहुल बाबा कोणत्याही मंदिरात गेल्यावर लोकांना जे वाटते तेच मी अयोध्येला गेल्यावर वाटणार? म्हणजे मी महाराष्ट्राचा राहुल आहे का? सांगा त्या फडणवीस काकांना सांगा. ते उगीच मला ‘मर्सिडीज बेबी’ बोलले. लोक तर मला महाराष्ट्रातला ‘राहुलबाबा’ बोलतात. ऐकलं का फडणवीस काका, असली हूं मैं असली. काय म्हणता, दिल्लीच्या राहुलपेक्षाही मी असली राहुलबाबा आहे. ऐकताय ना फडणवीस काका?
 
 
 
 
राहुल गांधींची कर्जमाफी..
 
 
 
राज्यात काँग्रेसचे सरकार येताच शेतकर्‍यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार. राहुल गांधी यांचे तेलंगणमध्ये वक्तव्य. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, आधी राहुल गांधींच्या काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता आहे, तिथे शेतकर्‍यांची कर्जमाफी करा, खरेच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्रातही सत्ताधारी आहे. पण महाराष्ट्रातल्या शेतकर्‍याची कर्जमाफी किती झाली? किती अनुदान शेतकर्‍यांना मिळाले? कोकणात वादळ आले, पूर आला... शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांचे होत्याचे नव्हते झाले. पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले. शेतकर्‍यांना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘पॅकेज’ जाहीर केले. पण ते शेतकर्‍यांना मिळाले का? सामान्य नागरिकांचेही हालहाल झाले. त्यांना मदत मिळाली का? याबाबत आढावा घेतला, तर सुरस आणि तितकेच संतापजनक सत्य समोर येते. ‘जनता उपाशी आणि सत्ताधारी तुपाशी’ हेच चित्र सगळीकडे आहे.
 
 
 
 
 
 
याच महाराष्ट्रात या महाविकास सरकारच्या काळात नाशिकमध्ये सोयाबीनचे बियाणे वितरित केले गेले. शेतकर्‍यांनी सगळी मेहनत केली. सोयाबीनचे पीक हाताशी येईल. मग, घरासाठी अमुक करू, तमुक करू, असे स्वप्न या शेतकर्‍यांनी पाहिले. पण सोयाबीनचे पीक आलेच नाही. कारण, सरकारतर्फे वितरित केले गेलेले सोयाबीनचे बियाणेच नकली होते. अगदी या सत्ताधारी नेत्यांच्या समाजप्रेमाइतकेच नकली. काही ठिकाणी, तर ७० रुपयांपर्यंतही शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले आहे. मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी कायदा आणला होता. तेव्हा उगीच लोकांना मोदी सरकारविरोधात भडकवण्यासाठी या कायद्याविरोधात समस्त महाविकास आघाडी कामाला लागली होती. कायदा रद्द झाला. आता बाजार समितीमध्ये सगळे आलबेल आहे का? दुधाचे भाव किती आहेत? कांद्याचे भाव किती आहेत आणि शेतकर्‍यांना त्यातून किती नफा मिळतो? राहुल गांधी हे सांगतील का? तेलगंणच्या सभेआधी ते काँग्रेसी पदाधिकार्‍यांना विचारत होते म्हणे की, “आज क्या बोलना हैं?” तर राहुल गांधींनी याबद्दल बोलावं, असे सांगण्याची हिंमत काँग्रेस पदाधिकारी आणि समस्त महाविकास आघाडी नेत्यांमध्ये आहे का?
 
 
@@AUTHORINFO_V1@@