महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील महिलांची फसवणूक!

मुख्य सूत्रधार अजित हिवरेला अटक करण्याची भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. संजय कुटे यांची मागणी

    28-Apr-2022
Total Views | 149
                                                                                          

ajit hiwares
 
मुंबई : महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाली असून या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी करावी व या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्याक्ष आ. संजय कुटे यांनी गुरुवारी केली. या मागणीचे निवेदन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले असून फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळाल्याखेरीज भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही , असा निर्धारही आ. कुटे यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यावेळी उपस्थित होते.
 
 
 
आ. कुटे म्हणाले की , अजित हिवरे यांनी राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत महिलांना स्वयंरोजगार देण्याचा व्यवसाय सुरु केला. मसाले पॅकिंग मशीन , बटन तयार करणारी मशीन , आटा मशीन याची विक्री मल्टी लेव्हल मार्केटिंग पद्धतीने करण्यासाठी सुमारे २६ जिल्ह्यांत या कंपनीच्या शाखा उघडल्या. जिल्ह्याजिल्ह्यात महिला डेव्हलपमेंट ऑफिसर नेमून व्यवसाय सुरु केला. प्रत्येक मशीनची किंमत ११ ते १५ हजार रु. दरम्यान ठेवण्यात आली. या मशीनद्वारे निर्माण केलेला माल कंपनीकडून खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
 
 
 
सुरुवातीला २-३ महिने महिलांनी खरेदी केलेल्या मशीनच्या मार्फत तयार झालेल्या वस्तू कंपनीने खरेदीही केल्या. त्यानंतर मात्र कंपनीकडून वस्तू खरेदी बंद झाली. आता तर कंपनीचे पुण्यातील कार्यालय बंद करण्यात आले असून कंपनीचा मालक हिवरे हा फरार झाला आहे. व्यवसाय वाढीसाठी अकोला , बुलडाणा जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांत सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचे उघड झाले आहे.
 
 
 
हजारो महिलांनी ११ हजार रु . भरून मशीन खरेदी केल्या आहेत. आपली फसवणूक झाल्यावर अनेक ठिकाणी महिलांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या महिलांनी आपल्या गावातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांशी , लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही आ. कुटे यांनी केले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121