ठाण्यात ‘या’ दिवशी बंद राहणार पाणीपुरवठा

    29-Mar-2022
Total Views | 73
 

stem water 
 
 
ठाणे: ‘स्मार्ट सिटी’चा दावा करणार्‍या ठाणे शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून ‘येनकेन’प्रकारे पाणीपुरवठ्याचे रडगाणे सुरूच आहे. ठाणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ‘स्टेम वॉटर डिस्ट्रिब्युशन’कंपनीच्यावतीने माणकोली एम.बी.आर येथे स्टेमच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्यात येणार असल्याने ‘झोनिंग’ पद्धतीने पाणी पुरवले जाणार आहे, यासाठी बुधवार ३० मार्च रोजी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून गेली ४० वर्षे पालिकेला स्वत:चे धरण उपलब्ध करणे शक्य झालेले नाही. विशेष म्हणजे, बहुतांशी ठाणेकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड कायम आहे. सद्यःस्थितीत जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच ‘व्हॉल्व’ बदलण्याच्या कामासाठी ‘शटडाऊन’ घेतल्याने अनेकदा पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवला जातो. आठवड्यातील प्रत्येक बुधवार तर निर्जळीचा वार असतो. आताही स्टेमच्या जलवाहिनीची गळती काढण्यासाठी बुधवार ३० मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार ३१ मार्च सकाळी ९ वाजेपर्यंत स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे महानगरपालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील उपलब्ध पाणीपुरवठा ‘झोनिंग’ करून केला जाणार आहे.
त्यामुळे बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत इंदिरानगर, श्रीनगर, रामनगर, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच बुधवार रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत समतानगर, ऋतूपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इटरर्निटी व मुंब्य्राच्या काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. या ‘शटडाऊन’मुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा पुर्वपदावर येईपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

भिशीचे फायदे अनेक असले, तरी भिशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण आणि त्याद्वारे पुढे सामाजिक कार्य उभे राहिल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. मनमाडमधील ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळ’ भिशीच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहे. केवळ पैसा हे उद्दिष्ट न ठेवता, महिलांनी एकत्र येऊन सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे, तसेच एकमेकांशी संवाद वाढावा, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. जाणून घेऊया, मनमाडमधील नोंदणी नसतानाही सर्वदूर प्रसिद्धीस पावलेल्या या अनोख्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121