मनसेचे सूचक ट्विट; "लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा!"

    13-Oct-2022
Total Views | 353

मनोज चव्हाण
 
 
 
मुंबई: आगामी अंधेरी पोटनिवडणुकीबाबत ऋतुजा लटकेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार होती. पण ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता असताना, आता मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी खळबळजनक ट्विट करून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
 
 
दरम्यान, ऋतुजा लटके यांची जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठी अनिल परब यांचा सगळा डाव असल्याचे मनोज चव्हाण यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे. हा डाव शिंदेंचा असल्याचे परब म्हणत होते. मात्र मनोज चव्हाण यांनी आता ठाकरेंवर उलट निशाणा साधला आहे. "मुळात ऋतुजा लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकावून अंधेरी विधानसभेची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचा डाव आहे. लटके वहिनींनी हा डाव ओळखावा इतकेच..." असे ट्विट करत ठाकरेंसह अनिल परबांवर आरोप केला आहे.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121