प.बंगालमध्ये जिहादींच्या अत्याचाराने गाठला कळस!

    11-Oct-2022
Total Views | 126
जिहादी
 
 
कोलकता :  पश्चिम बंगालमधील मोमीनपुरात विशिष्ट धर्माचे जिहादी बिगर इस्लामी समुदायाचा अनन्वित छळ करत आहेत. काही दिवसांपूर्वी या भागातील लोकांच्या घरावर व दुकानांवर इस्लामी झेंडे लावण्यात आले. परंतु ते काढल्याने येथील बिगर इस्लामी लोकांना लक्ष करण्यात आले. त्यानंतर एका महिलेने पुढे येऊन एका व्हिडीओद्वारे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
“आम्ही रात्रंदिवस भीतीच्या छायेत जगत आहोत. त्यांनी बॉम्ब फेकून दहशतीचे वातावरण निर्माण केले. आमच्या पोरांना घरातून हाकलून दिले. आमची घरे जाळली. भीतीपोटी आम्हाला आमची घरे सोडण्यास भाग पाडले गेले.”, अशी सदर महिलेने माहिती दिली. एका हिंदी वृत्तवाहिनीने या महिलेचा व्हिडीओ प्रकाशित केलेला आहे. तिथं राहणाऱ्या एका व्यक्तीच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार हिंसाचार झालेल्या ठिकाणाहून पोलीस स्टेशन अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तरीही पोलिसांना सदर ठिकाणी दाखल होण्यास चार तास लागले.
 
 
दरम्यान स्थानिक प्रशासनाने कोणतीही मदत न केल्याने अत्याचार झाला, असा आरोप करून रहिवाशांनी शोक व्यक्त केला. तर कोलकाताच्या महापौर आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या परिसराच्या अगदी जवळ राहत होत्या. पण त्यापैकी कोणीही स्थानिकांच्या मदतीला धावून गेले नाही, अशी माहिती मिळाली.
 
 
मोमिनपूर हिंसाचारात धर्मांध जिहादींनी पीडितांचे सर्व सामान जाळून राख केले आहे. मात्र तरीही पोलीस त्यांच्याबाबतीत मवाळ असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये एक माणूस मागून म्हणतो, "बघा, माझे घर पूर्णपणे जळाले आहे." तर आणखी एका पीडितेने सांगितले की, “आमच्या घरावर खिडक्यांमधून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. खिडकीच्या काचा फुटल्या होत्या आणि बेडवर सर्वत्र काचा पसरल्या होत्या. दगडफेकीमुळे सर्वत्र विटा पडल्या होत्या. सकाळी घाण साफ करायची. छत कोसळण्याची भीती होती. आमचे सर्व सामान बेडवर होते."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121