आपत्तीसमयी मदत हीच आमची भूमिका!

    19-Aug-2021
Total Views | 52
nutan soni  _1  
‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वाधिक नुकसान झाले ते रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होते त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे. भारतीय जनता पक्ष आणि इतर काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नूतन सोनी यांनी किमान ५००पेक्षा अधिक अन्नाच्या पॅकेटचे वाटप करायला सुरुवात केली व गरजूंना अन्य स्वरुपातही मदतीचा हात दिला. यानिमित्ताने सोनी यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
मुंबईतील भुलेश्वर, कुंभारवाडा आणि जवळपासच्या परिसरातील खर्‍या गरजूंना शोधून त्यांना मास्क, सॅनिटायझर, आरोग्यवर्धक काढा आणि दोन वेळचे जेवण देण्याचे महत्कार्य नूतन किशोर सोनी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि इतर सहभागी असलेल्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने लीलया पार पाडले. तसेच घरोघर जाऊन निर्जंतुकीकरणाची मोहिमही राबविली, ज्यामुळे कोरोनाचा या भागात शिरकाव होण्याला काही प्रमाणात अटकाव केला गेला.त्याचबरोबर गरजूंना रुग्णालयात भरती करणे आणि त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, ही प्राथमिकता समजून पुढील कार्याला सोनी आणि त्यांच्या टीमकडून सुरुवात करण्यात आली.
 
 
 
परराज्यातील मजुरांची होत असलेली अडचण लक्षात घेता, भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा, आर्थिक बाबींची मदत, या सर्व बाबी नूतन सोनी आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या माध्यमातून पुरविल्या गेल्या. १४ एप्रिल, २०२० रोजी श्रमिकांनी वांद्रे स्थानकावर गर्दी केल्याचे सर्वांना आठवत असेलच. मिळेल त्या वाहनाने, तर अनेक जण मुलाबाळांसह चालत त्यांच्या गावाकडे निघाले. रस्ता माहीत नाही, कधी पोहोचणार माहीत नाही, खिशात पैसे नाहीत. पण, इथे बेवारस मरण्यापेक्षा आपल्या पोहोचण्याची आस त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून कसलाही विचार न करता ते आपल्या गावाकडे निघाले. मदतीला मानवरूपातील देव धावून येईल, हा विश्वास होता. त्या भरवशावरच ते घराबाहेर पडले. त्यांना प्रवासात लागणारे खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या पुरविल्या.
 
 
 
कोरोनाकाळात ‘रेमडेसिवीर’ आणि ‘टेविझिंदाल’ ही इंजेक्शन उपयोगी पडायची. पण, ती उपलब्ध होत नव्हती. आजारच मोठा असल्याने त्यापासून बचावासाठी लोकांची इंजेक्शन खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडायची. ही सर्व आवश्यक औषधे कुठे मिळतात, याबाबत सोनी आणि भाजपचे कार्यकर्ते जागरूक राहून लोकांना सतर्क ठेवायचे. तसेच कोरोनाकाळात नूतन सोनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आरोग्यवर्धक काढा आणि मास्क व तत्सम आरोग्यविषयक आवश्यक बाबींचे वितरण केले. भुलेश्वर, कामाठीपुरा, कुंभारवाडा आणि वॉर्डालगतच्या भागांमध्ये वास्तव्यास असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना सोनी आणि सहकार्‍यांच्या वतीने रेशनचा विनामूल्य पुरवठा करण्यात आला. रेशनद्वारे दररोज लागणार्‍या सर्व धान्यांचे वाटप केले गेले. “समाजसेवा हे एक व्रत आहे. त्याची सुरुवात स्वतःच्या परिवारापासून झाली पाहिजे. भाजपच्या अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांकडून प्रेरित होऊन आम्ही हे सेवाकार्य सुरू केले होते. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गरिबातल्या गरीब माणसापर्यंत आपण करत असलेली मदत पोहोचली पाहिजे, ही शिकवण आम्हाला आमच्या नेत्यांनी दिली होती. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले आणि आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यातून आपण या समाजाचा घटक आहोत आणि देशासाठी काही तरी केले पाहिजे, अशी भावना आमच्या मनात आहे,” अशा भावना नूतन सोनी यांनी व्यक्त केल्या.
 



nutan soni  nutan soni 11

 
‘भगिनी सेवा समाज’ संस्थेची साथ
 
 
“कोरोनाची पहिली लाट आल्यापासून भाजप कार्यकर्त्यांनी प्रभागामध्ये कामाला अविरतपणे सुरुवात केली. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने मनापासून कामामध्ये जीव ओतून आपले योगदान देत होता. मात्र, आवर्जून उल्लेख करावा अशा काही घटकांचा पाठिंबा आणि मदत या सर्व कार्यात लाभली,” असे नूतन यांनी आवर्जून नमूद केले. “‘भगिनी सेवा समाज’ संस्थेनेही या कार्यात विविध प्रकारची मदत केली,” असे नूतन सोनी यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या काळातील थंडीच्या दिवसांमध्ये डोक्यावर घराचे छप्पर नसलेल्या गोरगरिबांना चादरींचेही वाटप या काळात करण्यात आले. “या कामातून आम्ही त्या वंचितांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला,” असे सोनी म्हणाल्या.
 
 
अडथळ्यांची शर्यत
 
 
या महामारीच्या काळात स्वतःच्या घरातीला व्यक्तीला जर संसर्ग झाला, तर घरातील व्यक्तीच्या मनातदेखील एक असुरक्षिततेची भावना निर्माण होत असे. अशा वातावरणात घरातील सदस्यांना सोडून ही मंडळी समाजसेवेसाठी मैदानात उतरली होती. ही खरोखरच खूप विलक्षण बाब होती. एकाच वेळी जबाबदारी आणि तणाव या गोष्टी व्यक्तीच्या स्थैर्याची परीक्षा घेत असतात. मात्र, सुदैवाने अशा बिकट काळातही या लोकांना समाजातीला अनेक घटकांचे सहकार्य लाभले. कोरोनाकाळात त्यांच्या पुढे सर्वात मोठे आव्हान होते, ते म्हणजे ‘ऑक्सिजन’पुरवठ्याचे. ‘ऑक्सिजन’पुरवठ्याचे खूप मोठे संकट या कालावधीत निर्माण झाले होते. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी पडत जाणारी वैद्यकीय साधनसामग्री आणि अपुरी आरोग्य यंत्रणा, दैनंदिन मदतकार्यात येणारे अडथळे, कोरोना संसर्गाची भीती या सर्व बाबींची काळजी घेत मोठ्या हिमतीने या भाजप कार्यकर्त्यांनी हे मदतकार्य केले.
 
 
कुटुंबाचा भक्कम आधार
 
 
नूतन सोनी म्हणाल्या की, “माझ्या या सेवाकार्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच सामाजिक संघटनांनी तर साथ दिलीच; मात्र या सर्व घडामोडीत माझ्या परिवाराने मला खूप खंबीर साथ दिली. माझे पती, माझ्या दोन्ही कन्या आणि इतर कुटुंबीयांनी माझ्या या सेवायज्ञात आपापल्या परीने त्याग रूपात समिधा टाकल्या आणि मला खंबीर बनवले. त्यासाठी मी माझ्या कुटुंबीयांचे आभार मानते. वरिष्ठांचे पाठबळ आणि साथ. कोरोनाकाळात काम करण्यासाठी आम्हाला आमचे नेते अतुल शाह यांनी प्रत्येक क्षणाला प्रेरित केले. प्रत्येक कामात, प्रत्येक घडामोडीत, अडचणीच्या क्षणात अतुलजींनी आम्हाला जो आधार दिला जे पाठबळ दिले, जी ताकद उभी केली त्याचे मूल्य शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी या माध्यमातून अतुलजींचे मनापासून आभार मानू इच्छिते. आणखी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे भाजपच्या दिवंगत नेत्या जयवंतीबेन मेहता. माझ्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यात जयवंतीबेन मेहता यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. मी सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात जे काही काम केले आणि करत आहे त्यामागे जयवंतीबेन यांची खूप मोठी प्रेरणा आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं,” असे नूतन सोनी यांनी आवर्जून नमूद केले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121