छत्तीसगढ- अफवांवर विश्वास ठेवून होमिओपेथीचे ड्रॉसेरा कफ सिरप दारूत टाकून पिल्यामुळे छत्तीसगढ च्या बिलासपूर गावात ८ युवकांचा गेला बळी ,५ युवकांना केले 'CIMS' रुग्णालयात दाखल . दुर्घटना ही सिरर्गिट्टी या जिल्ह्यातील धुरीपुर या गावातील आहे. असे सांगितले जात आहे कि वस्ती मध्ये एका परिवारात या औषधाचा वापर केला जात होता परंतु युवकांनी हे औषध दारू मध्ये टाकून पिणे हे त्यांच्या जीवावर बेतले. जीव गमावणाऱ्या मधील ४ जणांनी बुधवारी सकाळी तर उर्वरित ४ जणांनी रात्री आपला जीव गमावला.
रात्री सूचना मिळताच पोलीस घटना ठिकाणी पोहचली. गावकर्यांनी एकसाथ ४ युवकांच्या मृत्यूची सूचना दिल्यावर पोलीस दचकले आणि मुख्य थाना अधिकारी यांचयासोबत घ़टना स्थळी पोहचले.चौकशीत सर्व स्थिती कळल्यानंतर बाकी आजारी युवकांना 'CIMS' रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यातील एका युवकाला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले कारण त्याच्या गंभीर परिस्थितीमुळे.
आता आरोग्य विभागाने गावकर्यांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.काही युवक असेही मिळाले ज्यांनी हे सिरप पिले होते पण त्यांना काही झाले नाही. पोलीस होम्योपैथीक क्लिनिक च्या डॉक्टरला अटक करण्यासाठी गस्त घालत आहे. इतर होम्योपैथीक डॉक्टरांचे म्हणणे आहे कि हे होम्योपैथीक औषध(मदर टिंचर) नसून नक्कीच डाल्यूटर असेल. मदर टिंचर मध्ये कमी पोटेन्सी असते याउलट डाल्यूटर मध्ये ९० टककेपेक्षा जास्त अल्कोहोल असते आणि द्रव पिल्यामुळे नक्कीच माणसाच्या 'लिवर' वर परिणाम होऊन मृत्यू होऊ शकतो .