मोदी पुन्हा एकदा पालक-विद्यार्थ्यांच्या भेटीला

    05-Apr-2021
Total Views | 45



modi_1  H x W:


पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी 7 एप्रिल 2021 रोजी संवाद साधणार


नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणाऱ्या विशेष कार्यक्रमाची चौथी आवृत्ती कोविड-19 नियमावलीच्या अनुषंगाने प्रथमच दूरसंवाद पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुधवारी 7 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता दूरदर्शन वाहिन्या तसेच डिजिटल माध्यमातून हिंदी व इतर प्रादेशिक भाषांमधून होईल. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे सलग चौथ्या वर्षी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे.


नववी ते बारावीतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी 17 फेब्रुवारी ते 14 मार्च 2021 या कालावधीत https://innovateindia.mygov.in/ppc-2021/ या संकेतस्थळावर विविध विषयांवरील ऑनलाईन सृजनशील लेखन स्पर्धा घेतली होती.


परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या चौथ्या भागासाठी जवळपास 14 लाख जणांनी नावनोंदणी केली आहे. सृजनशील लेखन स्पर्धेत 10.5 लाख विद्यार्थी, 2.6 लाख शिक्षक व 92 हजार पालकांनी उत्साहाने भाग घेतला. भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी 60% हून जास्त विद्यार्थी नववी व दहावीचे आहेत. ‘परिक्षा पे चर्चा’ पूर्व सृजनशील लेखन स्पर्धेत प्रथमच 81 इतर देशातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला.


परिक्षा पे चर्चा हा मुख्य कार्यक्रम दूरदर्शन वाहिन्या तसेच EduMinofIndia, narendramodi, pmoindia, pibindia, DoordarshanNational, MyGovIndia, DDNews, RajyaSabhaTV, SwayamPrabha ही डिजिटल माध्यमे त्यांच्या फेसबुक आणि युट्युब वाहिन्यांवर 7 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रसारित करतील. #ExamWarriors #PPC202 हे हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांमध्ये वापरले जात आहेत.


परिक्षेचा उत्सव करणाऱ्या ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी देश एकत्र येईल ज्यामुळे देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना पंतप्रधानांच्या उभारी देणाऱ्या शब्दांचा लाभ घेता येईल.


अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121