बिहारमध्येही स्वबळाची जत्रा

    19-Jun-2025   
Total Views | 17

स्वबळाच्या सप्तरंगी चर्चा या महाराष्ट्रासह बिहारच्या राजकारणालाही तशा नवीन नाहीत. यंदाही आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी हौशे, नवशे, गवशांनी बेटकुळ्या फुगवून स्वबळ आजमवण्याच्या राणाभीमदेवी थाटात गर्जना केल्या आहेत. त्यानिमित्ताने बिहारमधील स्वबळाच्या राजकीय जत्रेचा वेध घेणारा हा लेख...

बिहार विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. ऑटोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि आघाडीतील जागावाटपाबाबत चर्चा देखील तीव्र झाल्या आहेत. राष्ट्रीय जनता दल (राजद)च्या नेतृत्वाखालील महाआघाडीत बैठकांची मालिका सुरू आहे. त्याच वेळी, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ)मध्ये जागावाटपाबाबत औपचारिक चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. परंतु, दाव्यांचा बाजार जोरात सुरू आहे. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) ७० जागांवर दावा करत आहे. त्याच वेळी, जितनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा (लोकशाही)देखील १५ ते २० जागांवर दावा करत आहे. चिराग यांनी आधीच सांगितले आहे की, ते २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवतो, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, आजघडीला तरी बिहारमध्ये असे चार नेते आहेत, जे बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) हा बिहारमध्ये जनता दल (संयुक्त) नेतृत्वाखालील रालोआचा भाग आहेत. चिराग पासवान यांनी आरा येथील वीर कुंवर सिंह स्टेडियममध्ये एलजेपीआरच्या नवसंकल्प सभेत घोषणा केली होती की, त्यांचा पक्ष बिहारमधील सर्व २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. चिराग यांनी त्याच रॅलीत स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले होते आणि म्हटले होते की, "आपण ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’साठी निवडणूक लढवीत आहोत. आमची युती फक्त आणि फक्त बिहारच्या लोकांसोबत आहे.” चिराग पासवान यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले होते की, "लोजपाप्रमुख प्रमुख रालोआसोबतच निवडणूक लढवण्याबद्दल बोलले आहेत.” त्याच वेळी, जदयूचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते की, त्यांना या विधानाची माहिती नव्हती. चिराग यांच्या या धोरणामुळे जदयू बर्यापैकी नाराज आहे. त्याचवेळी चिराग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दाबाहेर नाहीत आणि पंतप्रधान मोदी हे नितीशना नाराज करणार नाहीत, असाही विश्वास जदयू नेते खासगीत व्यक्त करत आहेत. मात्र, यावेळी चिराग पासवान हे बिहारमध्ये आपले वर्चस्व वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, यात कोणतीही शंका नाही.

२०२० सालच्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन आणि स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करून पुष्पम प्रिया चौधरी प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. पुष्पम प्रिया यांनी स्वतः दोन जागांवरून निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या पक्षाने २४३ जागांवर उमेदवार उभे केले. तथापि, त्यांच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. पुष्पम प्रिया यांनी यावेळी बिहारमधील सर्व २४३ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, "जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत आमचा पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही.” मात्र, ‘पुष्पम प्रिया फॅटर’ बिहारमध्ये अगदीच प्रभावहीन असल्याची सत्यस्थिती आहे.

भारतीय पोलीस सेवेतील (भापोसे) माजी अधिकारी आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई शिवदीप लांडे यांनी काही महिन्यांपूर्वी ‘हिंदू सेना’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. बिहारच्या पोलीस महानिरीक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करणारे शिवदीप लांडे यांनी सर्व २४३ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणाही केली आहे. शिवदीप लांडे विधानसभा निवडणुकीच्या तयारीतही व्यस्त आहेत. हिंदू सेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि लोकांना विशेषतः तरुणांना संघटनेशी जोडण्यासाठी ते वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करण्यात व्यस्त आहेत.

निवडणूक रणनीतीकारापासून राजकारणी बनलेले जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी एक वर्षापूर्वी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली होती. ‘पीके’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांचाही पक्ष राज्यातील सर्व २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. पीके यांनी जाहीर केले आहे की, जनसुराज पक्ष २४३ जागांवर उमेदवार उभे करेल. त्यांनी कोणत्याही पक्षासोबत युती करण्याची शयतादेखील फेटाळून लावली आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे की, जनसुराज पक्ष निवडणुकीपूर्वी किंवा नंतर कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही.

बिहारमध्ये वरील चारजण २४३ जागांवर निवडणूक लढवण्याचे बोलत असले, तरीही त्यात महत्त्व द्यावे असे दोनच नेते आहेत. ते म्हणजे चिराग पासवान आणि प्रशांत किशोर. चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या, रामविलास पासवान यांच्या निधनानंतर अतिशय कौशल्याने आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या काकांशी झालेला संघर्षही त्यांना चांगल्या पद्धतीने हाताळला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांना अतिशय चांगला समन्वय ठेवला आहे. बिहारमधील नव्या पिढीचे राजकारणी असलेल्या चिराग पासवान यांना मोठी राजकीय संधी आहे. ताजा चेहरा आणि वडिलांची राजकीय पुण्याई या जोरावर ते ‘लंबी रेस का घोडा’ ठरू शकतात. त्याचवेळी प्रशांत किशोर मात्र आपल्याच प्रतिमेत अडकल्याचे चित्र आहे. "मी मसिहा असून बिहारला मीच संकटातून बाहेर काढू शकतो,” असा त्यांचा अविर्भाव. अर्थात, असाच अविर्भाव लालूप्रसाद यादव आणि मुख्यमंत्री नितीश कुमारही दाखवत असतात. मात्र, प्रशांत किशोर यांच्या अविर्भावात एक प्रकारचा ‘एलिटनेस’ असून तोच त्यांना घातक ठरणार आहे, असे स्पष्ट मत बिहारमधील भाजपच्या एका ज्येष्ठ विधीज्ञ खासदारांनी गप्पांमध्ये सांगितले. अर्थात, असे असले तरीही प्रशांत किशोर यांना कमी लेखण्याची चूक भाजप, जदयु, राजद आणि काँग्रेस नक्कीच करणार नाही.

भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी रालोआने विविध पातळ्यांवर प्रचार सुरू केला आहे. एकतेचा संदेश देण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. फेब्रुवारीपासून बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे ६०हून अधिक पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत. रालोआमधील घटकपक्षांनीही जिल्हा पातळीवर समन्वय बैठका सुरू केल्या आहेत. महागठबंधनच्या तुलनेत रालोआ एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121