नव्या विषाणूबद्दल मोदींचं महत्वाचं वक्तव्य!

    29-Nov-2021
Total Views | 224

सद् _1  H x W:



नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी ११ वाजतापासून सुरू झाले. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा नवा विषाणू 'ओमिक्रॉन'बद्दल चिंता व्यक्त केली. देशवासियांनी सतर्क राहण्याची विनंती केली. तसेच आता नव्या विषाणूसह लढाई तीव्र करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.



मोदी म्हणाले, "देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. देशातील प्रत्येकजण आपापल्या परिने स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त देशासाठी आपापल्या परिने योगदान करत आहे. आपण पाहिलंतं की, संविधान दिनानिमित्त प्रत्येकजणाने हा संकल्प केला आहे. भारताचे हे संसंदेचे संत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासारखीच भावना संसदेच्या कामकाजात दिसू द्या."

"संसदेत प्रश्न विचारले जावेत आणि कामकाजही शांततेच सुरू रहावे, असे आवाहन मोदींनी केले. सरकारच्या नितीविरोधात आवाज प्रखर व्हावा मात्र, त्यासोबतच संसदेच्या अध्यक्षांचा आणि संसदेच्या कामकाजात एक आदर्श असावा जो येणाऱ्या पीढीला कामी येईल. कोरोनाच्या गंभीर काळातही आपण शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाले. आता आपण दीडशे कोटींचा पल्ला गाठणार आहोत. ". असेही ते म्हणाले.

"नव्या विषाणूबद्दलच्या बातम्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे सतर्कता बाळगली पाहिजे. देशाचं स्वास्थ हे आपली प्रार्थमिकता आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सुरू असलेली मोफत अन्नधान्य वाटप योजना मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. गरीब कुटूंबाच्या घरातील चुल धगधगती राहीली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारं हे अधिवेशन ठरो," अशी मी अपेक्षा ठेवतो असेही मोदी म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121