सावरकरांच्या योगदानावर आक्षेप घेतल्यावर स्वातंत्र्याचा अपमान होत नाही का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2021   
Total Views |

IMG-20211119-WA0007_1&nbs 
 
 
 
मुंबई : 'अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याबाबत एक वक्तव्य केले होते, त्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. मात्र, जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानावर आक्षेप नोंदवला जातो, तेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही का ?' असा सवाल ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांनी उपस्थित केला. 'सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई' तर्फे आयोजित युवा लेखक अक्षय जोग लिखित 'स्वातंत्रवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे आक्षेप आणि वास्तव' या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी वडाळा येथील 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
 
 
सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षपद सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि सावरकर चरित्र लेखक वैभव पुरंदरे, पुस्तकाचे लेखक अक्षय जोग आणि प्रकाशक महेश पोहनेरकर हे उपस्थित होते.
 
 
 
पुढे बोलताना वैभव पुरंदरे म्हणाले की, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या तथाकथित क्षमपत्रांवर अक्षय जोग यांनी लिहिलेले हे पुस्तक अप्रतिम आहे. अतिशय तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठपणे या पुस्तकाची मांडणी या अक्षय जोग यांनी केली आहे. सावरकरांच्या टाहाकाठीत माफीनाम्यावरून सावरकर प्रेमी आणि सावरकर विरोधक यांच्यात कायमच संभ्रम निर्माण झालेला आहे किंबहुना तो निर्माण करण्यात आला होता. सावरकरांची मते पटत नाहीत म्हणून त्यांचे स्वातंत्र्य युद्धातील योगदान नाकारता येत नाही. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर आणि महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये केलेली तुलना केवळ दुर्दैवीच होती. स्वातंत्र्यसमरात शिक्षा झालेल्या कुठल्याही देशभक्ताला सावरकर यांच्या इतका छळ झाला नाही. सावरकरांच्या तथाकथित माफीपत्रावरून आरोप प्रत्यारोप आणि वाद विवाद करणाऱ्या मंडळींनी एक गोष्ट लक्षात घायाळ हवी की, सावरकरांनी आपल्या सुटकेबाबत जो पत्रव्यवहार केला त्याचप्रमाणे सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारख्या अनेक देशभक्तांनी देखील आपल्या सुटकेसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता. काकोरी कटातील अनेकांनी सुटकेसाठी अशी पत्रे लिहिलेली होती, मात्र वाद केवळ सावरकर यांच्या बाबतीत निर्माण केला जातो. महात्मा गांधी, नेहरूंसह कुणीही सावरकरांच्या देशभक्तीपर संशय व्यक्त केला नव्हता, उलट महात्मा गांधी, नेहरूंसह सुभाषचंद्र बोस यांनीही सावरकर यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त केला होता. 'अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याबाबत एक वक्तव्य केले होते, त्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. मात्र, जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानावर आक्षेप नोंदवला जातो, तेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही का ?' असा सवाल ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
 
 
 
स्वातंत्र्यवीरांचे योगदान वादातीत : रवींद्र साठे
कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र साठे यावेळी म्हणेल की, स्वातंत्र्यवीरांचे संपूर्ण जीवनच उपेक्षेतच गेले. खरोखरच अक्षय जोग याचे आभार आणि अभिनंदन कारण त्याने एक उत्तम आणि वस्तुनिष्ठ पुस्तक सर्वांच्या समोर आणले. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि काही मंडळींनी सावरकरांवर टीका केल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा प्रसिद्धी मिळाली. ज्येष्ठ लेखिका अरुण ढेरे यांनी म्हटले होते की, ज्यांनी देशाला आपल्या करात सामावले ते खरे सावरकर होते, असे त्या म्हणाल्या होत्या. राष्ट्रीय एकात्मतेला विरोध असलेल्या मुस्लिमांना सावरकरांचा विरोध होता, ते मुस्लिमद्वेष्टे कधीच नव्हते. सावरकरांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय दुरागामीत्वाचा पाया रचला होता. मुळात सनदशीर मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हीच सावरकरांची इच्छा होती. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सावरकरांचे योगदान वादातीत आहे, असे रवींद्र साठे यांनी बोलताना म्हटले.
 
 
 
या पुस्तकाचे प्रकाशक महेश पोहनेरकर उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, सावरकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मागील २० ते २५ वर्षांपासून सावरकरांच्या प्रतिमेचे हनन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशात स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे पहिले सरकार आले तेव्हापासून हे प्रकार सुरु आहेत," असे पोहनेरकर यांनी यावेळी म्हटले.
पुस्तकाचे लेखक अक्षय जोग म्हणाले की, स्वातंत्रवीर सावरकरांविषयी अनेक समज गैरसमज पसरविण्यात आले. सावरकर आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांवरही अनेक गोष्टी बोलल्या जातात. सावरकर जेव्हा देशासाठी शिक्षा भोगत होते तेव्हा नाशिक काँग्रेसने सावरकर यांच्या मुक्ततेसाठी अनेक प्रयत्न केले होते. स्वतः महात्मा गांधींनी सावरकर आणि त्यांच्या बंधूंच्या सुटकेसाठी प्रयत्न केल्याचे, लेख लिहिल्याचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. अनेक समकालीन घटना, अनेक महत्त्वपूर्ण तत्कालीन पुरावें आणि पत्रांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. सावरकर यांच्या सुटकेसाठी इतरांनी केलेले प्रयत्न आणि त्यावरील आक्षेप, समज आणि गैरसमज या सर्व बाबी या पुस्तकात उल्लेखित करण्यात आल्या आहेत," असे अक्षय जोग यांनी म्हटले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@