केडीएमसीत पाळीव कुत्र्यांसाठी परवाना पद्धतच नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Sep-2020
Total Views |
KDMC_1  H x W:




पाळीव कुत्र्यांसाठी परवाना पद्धत लागू करण्यासाठी कडोंमपची चालढकल

डोंबिवली (जान्हवी मोर्ये) : श्वानप्रेमी घरात हजारो रूपयांचा कुत्र पाळतात. मात्र कुत्र्यांचे लसीकरण करण्या विषयी उदासीनता दिसून येते. कल्याण-डोंबिवली महापालिकेने श्वान परवाना पध्दत लागू केल्यास त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल. याशिवाय श्वान मालक लसीकरणविषयी सजग होतील. श्वान परवाना पध्दत लागू करावी यासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन या संस्थेतर्फे पशुवैद्यक डॉ. मनोहर अकोले गेल्या चार वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत. ही पध्दत लागू करू असे सांगत प्रशासनाकडून केवळ चालढकल केली जात आहे. त्यामुळेही ही पध्दत अद्याप सुरू करण्यात आली नाही.
 
 
 
श्वान प्रेमी घरात श्वान पाळतात. भटकी कुत्री केवळ श्वानदंश करतात असे नाही. पाळीव श्वानांचे देखील चावा घेण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र ते उघड होत नाही. पाळीव श्वान धारकांना आपला श्वान कुणालाही चावत नाही असे वाटते. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २२ ते २५ हजार पाळीव श्वानधारक आहे. या श्वानांना रॅबीज, साथरोगावरील लस, पचन संस्थेशी संबधित असलेल्या कोरोनाचे लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. कल्याण-डोंबिवलीत ८२ श्वानप्रेमी आहे. या श्वानप्रेमीकडून त्यांना जेवण दिले जाते. तसेच लसीकरण केले जाते.
 
या श्वान प्रेमीमुळेच श्वान दंशाचे प्रमाण कमी आहे. नागरिकांमध्ये मात्र या श्वान प्रेमीमुळे श्वान दंशाचे प्रमाण वाढत आहे अशी समजूत आहे. श्वान प्रेमीमुळे नागरिकांना श्वान दंशामुळे संरक्षण मिळते. परवाना पध्दत असली की श्वान मालक दरवर्षी नियमित लसीकरण करून घेतील. त्यांच्यामध्ये योग्य ते संगोपन, रेबीजविषयी तीव्रता निर्माण होईल. या रोगावरील उपचारासाठी होणारा खर्च ही टाळता येईल. हा परवाना एक वर्षासाठी असतो त्यानंतर त्यांची मुदत वाढवून घ्यावी लागते. परवाना पध्दत मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे आहे पण कल्याण-डोंबिवलीत ही पध्दत अद्याप लागू करण्यात आली नाही. कल्याण-डोंबिवली एकच निबीर्जीकरण केंद्र आहे त्यांची ही संख्या वाढण्याची गरज आहे, असे ही अकोले यांनी सांगितले.
 
 
संस्थेच्या माध्यमातून शाळा- महाविद्यालय रॅबीज या रोगांविषयी जनजागृती निर्माण करीत आहेत. या उपक्रमाला प्रकल्पप्रमुख डॉ. मनोहर अकोले, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड कैलास सोनवणो यांचे सहकार्य लाभले आहे. यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
 
रेबीज बाबतीत भारत जगात दुसरा तर आशियात पहिला
 
 
कुत्र्यापासून होणा:या रेबीज या रोगामुळे भारताचा जगात दुसरा आणि आशिया खंडात पहिला क्रमांक लागत आहे. दरवर्षी भारतात ३५ हजारांहून अधिक लोक बळी पडत आहे. या रोगाने जगात दर एका मिनिटाला एक व्यक्ती मृत्यूमुखी पडत आहे. हा रोग गलिच्छ वस्तीमध्ये जास्त होतो. लहान मुलांमध्ये ४२ टक्के या रोगांचे प्रमाण आहे. पाळीव श्वानधारकांमध्ये केवळ सहा टक्के लोक नियमित लसीकरण करून घेतात.
 
डोंबिवलीत साडेतीन हजारांच्या वर नागरिक इंजेक्शन घेण्यासाठी येतात. एका व्यक्तीला दोन हजार रूपये इंजेक्शनचा खर्च गृहीत धरला तरी वर्षाला ८५ कोटीचे नुकसान या रॅबीजमुळे होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेला २०३० र्पयत रॅबीजचे उच्चटन करायचे आहे. दरवर्षी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि वेटेनर्स प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशन यांच्यातर्फे भटक्या कुत्र्यासाठी मोफत श्वान दंश लसीकरण सप्ताह आयोजित केला जातो. गेल्या नऊ वर्षापासून हा सप्ताह साजरा होत आहे. यंदा ही हा सप्ताह सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@