‘गोपियुष’ घेऊया, ‘इम्युनिटी’ वाढवूया!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

go piyush tab_1 &nbs



अभिनव उत्पादनांची निर्मिती करणार्‍या ‘पितांबरी’ कंपनीने 3 वर्ष संशोधन करुन निरोगी देशी गाईच्या दुधापासून रोगप्रतिकारशक्तीवर्धक ‘गोपियुष कॅप्सुल’ आणि ‘गोपियुष च्युएबल टॅब्लेट्स’ तयार केल्या आहेत. सध्या ‘कोविड-१९’च्या संक्रमणापासून आपल्याला वाचायचे असेल, तर सर्वात जास्त गरज आहे ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि त्यासाठी आयुर्वेदानुसार ‘ओज’ व ‘सप्त’ धातू वर्धन होणे आवश्यक आहे. ‘गोपियुष’ सप्त धातूंपैकी रस धातू आणि शुक्र धातू यांची त्वरीत वाढ करते. त्यामुळे शरीरामध्ये ओजाचा संचय होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढीस लागते.



दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहेच. कित्येक घरांमध्ये आई-वडील आपल्या मुलांच्या नाश्त्यामध्ये एक ग्लास दुधाचा आवर्जून समावेश करतात. यातील बहुतांश लोक देशी गाईचे दूध पिणे पसंत करतात. कारण, मुलांचा शारीरिक विकास होण्यासाठी देशी गाईच्या दूधातील पोषक घटक उपयुक्त असतात. परंतु, सहजप्राप्त होणार्‍या देशी गाईच्या दूधात किती अद्भुतता आहे, हे आपल्याला सध्याच्या वातावरणात उमजून येईल. कारण, कोरोना संक्रमणापासून वाचायचे असेल, तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती सक्षम असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ‘कोविड-१९’च्या महामारीत आपल्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ‘इम्युनिटी बुस्टर’ म्हणून गाईच्या दूधाची अपार मदत होणार आहे.


सामान्यत: आपल्याला एवढंच माहीत असतं की, आपल्याला मिळणारे दूध हे शेतकरी डेअरीत देतात. ती डेअरी दूध निर्जंतुक करुन आपल्यापर्यंत पोहोचवते. ते बहुदा देशी गाईचे, जर्सी गाईचे किंवा म्हशीचे असते. यातील देशी गाईपासून मिळणारे दूध हे पूर्णान्न आहे, हे सर्वश्रुत आहे. कारण, या दूधात प्रोटिन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन ई, बी, ए, डी, के यांशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन असे सर्वच पोषक घटक असतात. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. म्हणूनच दूधाला ‘पूर्णान्न’ म्हटले आहे, हे यथार्थ आहे. आयुर्वेदात वर्णन केलेल्या विविध बल्य, पौष्टिक औषधांमध्येही देशी गाईचे दूध हे एक श्रेष्ठ औषध असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच अनेक संशोधनातूनही ते एक उत्तम औषधी असल्याचे सिद्ध झाले आहे. हे ओळखून अभिनव उत्पादनांची निर्मिती करणार्‍या ‘पितांबरी’ कंपनीने तीन वर्ष संशोधन करुन निरोगी देशी गाईच्या प्रसुतीनंतर पहिल्या तीन दिवसांत मिळणार्‍या दुधापासून ’गोपियुष कॅप्सुल’ आणि ’गोपियुष च्युएबल टॅबलेट्स’ तयार केल्या आहेत. गो, गाय आणि पियुष अमृत म्हणजेच गाईपासून मिळणारं दूध, जे त्यातील विविध पोषक घटकांमुळे अमृतासमानच आहे. ‘गोपियुष’ म्हणजेच भारतीय देशी गाईच्या प्रसुतीनंतर प्रथम तीन दिवसांचे दूध होय. ज्याला ‘चिकाचं दूध’ किंवा इंग्रजीमध्ये ‘कोलोस्ट्रम’ असे म्हणतात.



म्हशीचा चीक घट्ट असल्याने त्याचा सहज खरवस होतो. म्हणून अनेक गोठ्यांमध्ये म्हशीचा चीक साठवून ठेवून खरवस म्हणून विकला जातो. मात्र, गाईचा चीक पातळ असल्याने त्याचा तसा उपयोग नसल्याने तो फेकून दिला जातो. ही बाब लक्षात येताच, ‘पितांबरी’च्या ‘रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ टीमने गाईचा चीक गोळा करुन त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन ’गोपियुष टॅब्लेट’ची निर्मिती केली. ‘पितांबरी’ने सुरुवातीला ‘गोपियुष टॅब्लेट्स’ बनवून त्याची उपयुक्तता तपासायला सुरुवात केली. कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीला अशक्तपणा घालवण्यासाठी ‘पितांबरी’ची ‘गोपियुष टॅब्लेट’ काही दिवस दिली असता, त्याचा खूपच चांगला उपयोग झाला. त्या व्यक्तीवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी ते मान्यही केलं. पुढे असं लक्षात आलं की, कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जो कमालीचा अशक्तपणा येतो, तो घालवण्यासाठी ‘गोपियुष टॅब्लेट’ उपयोगाची आहे. या ‘गोपियुष टॅब्लेट’मुळे शरीरात पांढर्‍या पेशी तयार होतात. या पेशी शरीरात प्रवेश करु पाहणार्‍या घातक विषाणूंना लढा देण्यासाठी उपयुक्त असतात. तसेच त्या प्रतिकारकशक्ती वाढवण्याचं काम करतात. ‘गोपियुष टॅब्लेट’मधून शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिनं मिळणही शक्य होतं. ‘पितांबरी’ने २५ तज्ज्ञ-डॉक्टरांच्या मदतीने अजून बरेच प्रयोग केले आणि सर्व वयोगटातल्या व्यक्तींना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘पितांबरी गोपियुष टॅब्लेट’ हे उत्पादन अतिशय उपयुक्त असल्याचं सिद्ध केलं आहे.




नवजात बालकाला जन्मल्यापासून ४८ तासांच्या आत मिळणार्‍या आईच्या दूधातून रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे घटक मिळतात. त्याचप्रमाणे गाईच्या प्रसुतीनंतर पहिल्या तीन दिवसांत जे दूध मिळतं, त्यात सामान्य दुधापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते. तसेच सामान्य दुधापेक्षा १० पट अधिक ’व्हिटॅमिन ए’ असते, तर तीन पट अधिक ‘व्हिटॅमिन डी’ असते. हे घटक खासकरुन शरीराची रोगप्रतिकारकशक्ती अधिक क्षमतेने वाढवून शरीराला रोगाविरुद्ध लढण्यास मदत करतात. म्हणूनच आयुर्वेदामध्ये या दूधाचा उल्लेख ‘गोपियुष’ असा केला आहे. ‘चरक’, ‘सुश्रुत’, ‘भावप्रकाश’ आणि ‘चापाणी’ या आयुर्वेदिक ग्रंथात ‘गोपियुष’ला ‘बल्य’ म्हणजेच शक्तिवर्धक आणि ‘बृहण द्रव्य’ म्हणजेच शरीर दृढ करण्यास उपयुक्त असे औषध म्हटलेले आहे. हल्ली तुम्ही ’ए-१0’ आणि ’ए-२’ मिल्क असे दुधाचे प्रकार ऐकले असतीलच. भारतात विविध जर्सी आणि एचएफ प्रकारच्या संकरित गाई आहेत. यातील ‘ए-1’ दुधाच्या प्रकारात ’हिस्टिडीन’ हे अमिनो अ‍ॅसिड असते तर ‘ए-२’ दुधाच्या प्रकारात ’प्रोलिन’ नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते. यात ‘ए-१’ प्रकारच्या दुधाच्या सेवनाने उच्च रक्तदाब, डिजनरेटिव्ह व्याधी तसेच वृद्धावस्थेत मानसिक विकार होऊ शकतात. म्हणून वरती आवर्जून सांगितले आहे की, आयुर्वेदात वर्णन केलेले सर्व गुणधर्म हे फक्त आणि फक्त भारतीय देशी गाईच्या ‘गोपियुष’मध्ये असतात. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकक्षमता वाढविण्यासाठी फक्त ‘ए-२’ प्रकारचे म्हणजेच भारतीय देशी गाईचे दूधचं उपयुक्त आहे.

go piyush tab_1 &nbs



वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, शरीराचे पोषण करण्यात ‘गोपियुष’चा विलक्षण गुण आहे. त्यात विविध घटकद्रव्ये असतात. ज्यात इम्युन फॅक्टर्स, ग्रोथ फॅक्टर्स आणि अन्य काही पोषकतत्त्वे असतात. ‘इम्युन फॅक्टर्स’मध्ये प्रोलीनरीच पॉली पेप्टाईड्स, इम्म्युनोग्लोब्युलिन्स, लॅक्टोफेररीन, ट्रान्सफेरीन सारखे घटकद्रव्ये असतात. ‘ग्रोथ फॅक्टर्स’मध्ये ट्रान्स फॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स (टीजीएफए आणि टीजीएफबी) एपिथेलील ग्रोथ फॅक्टर्स, एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर्स आणि अन्य काही ग्रोथ फॅक्टर्स त्यात असतात. तसेच पोषक अंगांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अमिनो अ‍ॅसिड्स असतात. यातील प्रोलीनरीच हे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी मजबूत करण्याचे कार्य करतात. सध्या ‘कोविड-१९’च्या संक्रमणापासून आपल्याला वाचायचे असेल तर सर्वात जास्त गरज आहे, ती रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि त्यासाठी आयुर्वेदानुसार ’ओज’ व ’सप्त’ धातुवर्धन होणे आवश्यक आहे. ‘गोपियुष’ सप्तधातूंपैकी रस धातू आणि शुक्र धातू यांची त्वरित वाढ करते. त्यामुळे शरीरामध्ये ओजाचा संचय होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढीस लागते. यासोबतच ‘गोपियुष’मधील ‘इम्युनोग्लोब्युलिन्स’ म्हणजेच ‘आयजीएम’, ‘आयजीजी’ आणि ‘आयजीए’ हे घटक शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरस यांना नष्ट करुन शरीराबाहेर काढते. ‘लॅक्टोफेरीन’ या घटकामुळे शरीरात अ‍ॅण्टिबॉडिज तयार होतात. हे शरीरातील रोगकारक जीवाणूंच्या विरोधात सर्व प्रथम संरक्षण कवच निर्माण करते. ‘लॅक्टोफेरीन’मुळेच शरीरातील ‘टी’ पेशी आणि ‘बी’ पेशी वाढतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसेच भविष्यात होणार्‍या काही ऑटो इम्युन व्याधींपासूनदेखील शरीराचे संरक्षण होते. त्यामुळे देशी गाईपासून मिळणार्‍या ‘गोपियुष’चे सेवन करणे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.




देशी गाईच्या ‘गोपियुष’मध्ये संधिवात, दमा, स्थूलता या रोगांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. हे दूध ‘मेध्य’ म्हणजेच मेधाशक्तिवर्धक असून यातील ‘ओमेगा 3’ फॅटी अ‍ॅसिड रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. तसेच ते मेंदूसाठीही पोषक असते. यातील पोषणतत्त्वामुळे आपल्या मेदूंची कार्यक्षमता वाढते. शिवाय मेंदूशी संबंधित कित्येक आजारांपासून संरक्षण होण्यासही मदत मिळते. गाईच्या दुधातील ‘ओमेगा’ हा घटक कर्करोगासारख्या रोगांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण घटक असल्याचेही विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे. पण, आपल्या भारतीय गाईंच्या दुधामध्ये निसर्गत: उपलब्ध असलेल्या या घटकाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. यात आपलेच नुकसान आहे. त्यामुळे गंभीर आजारांवर मात करण्यासाठी येत्या काळात ‘गोपियुष’चे महत्त्व लक्षात घेऊन ते उपयोगात आणणे गरजेचे ठरणार आहे.


याशिवाय मधुर रस, शीतवीर्य, मधुर विपाक असे शास्त्रातील गुण असलेले ‘गोपियुष’ वातविकार, पित्तविकार, कावीळ, यकृत संबंधित आजारांवर तसेच कफाचे क्षमन करण्यासाठी उपयुक्त ठरते. ‘गोपियुष’मध्ये कॅल्शियमचे घटक आहेत. त्यामुळे याच्या सेवनाने हाडांच्या व्याधींवर मात करणेही शक्य होईल. दीर्घकालीन तापातून विशेषत: मलेरिया, टायफॉइड आणि संसर्गजन्य तापापासून ते टीबी, एड्स आणि कर्करोगापर्यंत अनेक आजारांत रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘गोपियुष’चा उपयोग पूरक औषध म्हणून होतो हे सिद्ध झाले आहे. परंतु, वर्षभर ‘गोपियुष’ ताजे मिळणे आणि तेसुद्धा शहरात मिळणे तर अत्यंत कठीण आहे. तेव्हा ‘गोपियुष’पासून तयार केलेल्या औषधींचे सेवन करणे आपल्याला वरील सर्व फायदे मिळण्यासाठी उपयुक्त ठरु शकणार आहे. ‘गोपियुष’च्या सेवनाचे इतर दुष्परिणाम नसल्याने जोखीम कोणतीच नाही. हे देखील लक्षात घेतले पाहिजे.


कोविड योद्ध्यां’ना ‘गोपियुष’ टॅबलेटचे मोफत वाटप

कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. अशा या कठीण समयी अनेक जण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन या रोगाशी लढा देण्यासाठी काम करीत आहेत. अशा ‘कोविड योद्ध्यां’च्या मदतीकरिता ‘पितांबरी’ने पुढाकार घेतला आहे. विविध ठिकाणी कार्यरत असलेले आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी तसेच रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने सर्वेक्षण करणार्‍या स्वयंसेवकांना ‘पितांबरी’ने रोगप्रतिकारकशक्तीवर्धक ‘गोपियुष’ च्युएबल टॅबलेट्सचे मोफत वाटप केले आहे. या सर्वांना त्याचा चांगला प्रभावही जाणवला आहे. सध्या ‘लॉकडाऊन’सुद्धा उठवण्यात आला आहे. त्यामुळे विषाणूपासून लांब राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे. म्हणूनच पुढेसुद्धा ही मोहीम ‘पितांबरी’तर्फे सुरुच ठेवण्यात येणार आहे.

असे करा ‘गोपियुष’चे सेवन

सकाळी अनुशापोटी (रिकाम्यापोटी) पितांबरी ‘गोपियुष’ कॅप्सुलचे पाण्याबरोबर सेवन करावे, तर ‘गोपियुष च्युएबल टॅब्लेट’ चघळून खावी. लहान मुलेही ‘गोपियुष च्युएबल टॅब्लेट’चे सहजपणे सेवन करु शकतील. ‘गोपियुष टॅब्लेट’च्या अधिक माहितीकरिता आणि ऑर्डरसाठी ९००४०३२९१४ या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. ‘गोपियुष च्युएबल टॅब्लेट’च्या ४० टॅब्लेटची बॉटल तर ‘गोपियुष कॅप्सुल’ची ६० टॅब्लेटची बॉटल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑनलाईन मागणीसाठी www.pitambari.com <http://www.pitambari.com> या वेबसाईटवर तसेच घरपोच ‘गोपियुष’ हवे असल्यास १८०० १०३ १२९९ या टोल फ्री तसेच ९००४०३२९१४ या क्रमांकावर संपर्क करता येईल.

- डाॅ. मंदार फाटक
@@AUTHORINFO_V1@@