नवी दिल्ली : व्हाट्सएप व सोशल मीडियावर कोरोना विषाणूबद्दल पसरत असणाऱ्या अफवा रोखण्यासाठी व्हॉट्सअॅपने मोठा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज फॉरवर्ड करण्यावर आता मर्यादा घालण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅप यूजर्स आता एकावेळी फक्त एक वापरकर्त्याला मेसेज फॉरवर्ड करू शकतील. यापूर्वी एकाच वेळी एकाला पाच जणांना एक संदेश पाठविण्याची सुविधा होती, हे उपडेट पुढील काही दिवसात येणार असल्याची माहिती मिळते.
किंबहुना ट्विटर, गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांसमोर देखील कोरोना विषाणूबद्दल बनावट बातम्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात असल्याने यावर रोक बसविण्याचे मोठे आव्हान आहे. हे लक्षात घेऊन फेसबुकची मालकी असणाऱ्या व्हॉट्सअॅपने मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी एक नवीन मर्यादा निश्चित केली आहे, त्यानुसार तुम्ही एकाचवेळी मेसेज फक्त एका व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करू शकता.
यापूर्वी फेसबुकनेही बनावट बातम्यांना आळा घालण्यासाठी असा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गूगलही बनावट बातम्यांना फ्लॅग करत आहे. याशिवाय बनावट बातम्या रोखण्यासाठी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरही फिल्टर करीत आहे. व्हॉट्सअॅपच्या या निर्णयाची प्रशंसा होत आहे. असे म्हटले जाते आहे की, कंपनीच्या हा निर्णयाचे स्वागतार्ह आहे. यामुळे बनावट बातम्यांवर प्रतिबंध घातला जाईल. जगभरात व्हॉट्सअॅपचे दोन अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत, तर भारतात ४० कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात.