आपणही व्हा विजयी वीर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020
Total Views |


corona mumbai_1 &nbs


महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा प्रसार व्हायला लागल्यास आता दोन आठवडे होत आहेत. या दोन आठवड्यात दररोज काही रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे सरकारबरोबर प्रत्येक नागरिकाने या लढाईत उतरले पाहिजे. लढाई म्हणजे त्या विषाणूंचा स्वतःला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली तरी पुरे असते. म्हणजे त्याचा दुसर्‍याला त्रास होणार नाही.


चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले आहे. हजारो बळी घेतले आहेत. हा व्हायरस आपल्याकडे पसरू नये म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार, महापालिका यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण, आपण नागरिक हे सुद्धा सरकारचे घटक आहोत, किंबहुना आपणच सरकार आहोत, हे जाणून कोरोनाचे विषाणू थांबायला, त्यांचा प्रतिकार करायला आपल्यापासूनच प्रयत्न व्हायला पाहिजेत. जबाबदार नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडले, तरच सरकारचे प्रयत्न यशस्वी ठरतील. कोरोनाचा प्रभाव चौथ्या आठवड्यापर्यंत जोरात असतो, असे सांगण्यात येते. त्याप्रमाणे विचार केला तर महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा प्रसार व्हायला लागल्यास आता दोन आठवडे होत आहेत. या दोन आठवड्यात दररोज काही रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे सरकारबरोबर प्रत्येक नागरिकाने या लढाईत उतरले पाहिजे. लढाई म्हणजे त्या विषाणूंचा स्वतःला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेतली तरी पुरे असते. म्हणजे त्याचा दुसर्‍याला त्रास होणार नाही.



प्रयोगशाळेच्या अनुमानानुसार कोरोना विषाणूंचा आकार
४००-५०० मायक्रो इतका मोठा आहे. त्यामुळे खर्चिक मास्क घेण्याऐवजी प्रत्येकाने साधा मास्क वापरला तरी चालेल. विषाणूचे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही, खाली पडतो. त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही. संसर्गित व्यक्तीच्या शिंकण्यातूनही तो कपड्यांवर उडू शकतो. त्यामुळे जेथे हात लागेल, तेथे तो हाताला लागून संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून साबणाने हात-पाय धुणे किंवा सॅनिटायझर वापरणे आणि बाहेरून आल्यानंतर कपडे तसेच न ठेवता ते दररोज धुणे एवढी दक्षता घेतली तरी पुरेसे आहे. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारतो. त्याचा फुफ्फुसात संसर्ग होत नाही. गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि हस्तांदोलन करणे टाळले पाहिजे. प्रत्येकाने अशा प्रकारचे साधे उपाय केले आणि दक्षता बाळगली तरी सरकारच्या उपाययोजनांना आपली साथ मिळेल आणि कोरोना विरोधातील सरकरच्या लढाईमधील आपणही विजयी वीर ठरू.


गल्ली क्रिकेट


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी न करणे आणि गर्दीत शिरण्याचे टाळणे महत्त्वाचे ठरते
. म्हणून महासत्ता अमेरिकेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून सर्वत्र ‘शटडाऊन’ केले. महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा आणि महाविद्यालये काही दिवस बंद ठेवली आहेत. अत्यावश्यक कर्मचारी वगळून इतर खात्यांना आलटून पालटून फक्त ५०टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. गर्दीचे ठिकाण असलेली राणीची बाग बंद ठेवण्यात आली आहे. शहर आणि उपनगरातील सर्व लहान-मोठी उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. मुंबईतील गजबजलेल्या काही बाजारपेठांनी गुढीपाडव्यापर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. डबेवाल्यांनीही बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना समाजस्वास्थ्य आवश्यक वाटते, अशा सर्व घटकांनी सरकारच्या सर्व प्रयत्नांना मोलाची साथ दिली आहे. देशोदेशीच्या खेळाडूंचा भरणा असलेले आयपीएल क्रिकेट सामनेसुद्धा पुढे ढकलण्यात आले आहेत. हा सर्व जो बंद पाळण्यात आला आहे, तो एखाद्या संघटनेचा नव्हे, तर आपत्ती निवारणासाठी गर्दी टाळण्याकरिता बंद पाळण्यात येत आहे. अशा वेळी गल्ली क्रिकेटचे पेव फुटले आहे. २०-२५च्या घोळक्याने मुले गल्लीत, रस्तोरस्ती क्रिकेट खेळत असतात. मोठा गोंगाटही करत असतात. एकमेकांशी झोंबाझोंबी करतात. रस्त्यातला चेंडू उचलताना त्यांच्या हाताला अनेक प्रकारचे जंतू चिकटतात.



पालिकेने आवाहन करून आणि होणारे परिणाम सांगूनही मुंबईत थुंकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही
. या थुंकण्यातून आणि शिंकण्यातूनही रस्त्यात कोरोनाचे विषाणू पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गल्लोगल्ली क्रिकेट खेळताना चेंडू उचलताना हे विषाणू हातांना लागून त्याचा संसर्ग स्वतःसह दुसर्‍याला होण्याचा धोका नाकारता येत नाही. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी म्हणजे मुलांसह चौपाटीवर फिरायला जाणे नव्हे की मुलांनी रस्त्यात क्रिकेट खेळणे नव्हे. कोरोनाची लागण झाल्यावर स्वतःला बंदिस्त करून घेण्यापेक्षा आताच मुलांना आपल्या ताब्यात ठेवून त्यांना, स्वतःला आणि समाजाला या आजारांपासून दूर ठेवणे सर्वांच्या हिताचे ठरेल. पोलिसांनीही गल्ली क्रिकेटला रोखायला हवे.



- अरविंद सुर्वे
@@AUTHORINFO_V1@@