तात्या विंचूच्या बाहुल्या

    23-Feb-2020   
Total Views | 403

Jafarabad-protesters-oppo

 


शाहीनबाग दिल्लीच्या महिलामंडळाने आता म्हणे दिल्लीच्या जाफराबाद मेट्रो स्टेशनचा कब्जा घेतला आहे. का? तर म्हणे सीएएला विरोध करण्यासाठी. गेले कित्येक महिने या महिलांनी दिल्लीवासीयांना वेठीस धरले. या महिला कोण आहेत? यांच्यावर काही घरगुती, कौटुंबिक जबाबदार्‍या आहेत की नाही? त्या काही कामधंदे करतात का? हा एक संशोधनाचा विषय आहे. सध्या समाजमाध्यमांवर उत्तर प्रदेशातून शाहीनबागेत सीएए विरोधात धरणे द्यायला आलेल्या शिक्षिकेचा व्हिडिओ चांगलाच गाजतोय. ती उत्तर प्रदेशहून दिल्लीला आंदोलनाला आली होती. याचा अर्थ असा की, शाहीनबागेत सुरू असलेल्या सीएए विरोधात फालतू आंदोलनामध्ये देशभरातून अशा वृत्तीच्या महिलांची आवक सुरू आहे. असो, काश्मीरमध्येही हातात दगड घेणारी, मुंबईच्या दंगलीत गुन्हेगार शौहरला लपवण्यासाठी पुढे येणारी आणि आता सीएएचा ओ का ठो माहीत नसताना घरदार सोडून मौजमजेसाठी दिल्लीला घेरणारी ही महिला. या तीनही महिलांमध्ये साम्य आहे ते असे की, त्यांचे आयुष्य आजपर्यंत बुरखा आणि शौहरची किचकिच, अल्लाहच्या नावावर झालेली भाराभर मुले, पैशाची तंगी, स्त्री म्हणून सन्मान हक्क, योगदान काय असते याबद्दल शंखच. अशा परिस्थितीमध्ये राहणे, खाणे फ्री, देशाच्या राजधानीचे दर्शन फ्री मिळते आहे, वर बुरख्याच्या बाहेरच्या विश्वामध्येही आपली गणना होते म्हटल्यावर या महिला आंदोलनात उतरल्या असाव्यात. तीन तलाक, हलाला, बुरखा, भाराभर मुलांना जन्म देणे, अल्लाहच्या मशिदीमध्ये प्रवेश निषिद्ध या अशा अनिष्ट रूढी मोडण्यासाठी या महिला कधीच का बाहेर आल्या नाहीत? स्वत:चे चांगले काय, वाईट काय याबद्दल जराही विचार न करणार्‍या या महिला. कधीतरी दोजख, कयामत की रात वगैरेंच्या प्रकोपातून बाहेर येतील का? यातल्या ९० टक्के महिला तर केवळ त्यांच्या पुरुषांच्या इशार्‍यावर घराबाहेर आल्या आहेत. ते पुरुषही धार्मिकतेच्या नावावर अधर्मच करत असलेले बाहुले आहेत. हे बाहुले साधेसुधे नाहीत तर तात्या विंचूच्या पठडीतले आहेत. थोडक्यात, या महिला तात्या विंचूंच्या गुलाम असलेल्या बाहुल्या आहेत. कायद्याच्या चौकटीत त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. नाहीतर अनर्थ अटळ आहे.

 

विषवल्लीची नांगी...

  

मौनीबाबा म्हणून प्रसिद्ध असणारे मनमोहन सिंग यांनी तोंड उघडून म्हटले काय तर, “कट्टरतावादी राष्ट्र अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवाद आणि 'भारतमाता की जय' या घोषणेचा गैरवापर करण्यात येत आहे.” गेल्या काही दिवसांपासूनच्या घटना पाहा, वारिस पठाण, ओवेसींच्या व्यासपीठावर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा, दिल्लीला शाहीनबागला महिलांनी वेठीस धरले आहे, कायदा सुव्यवस्थेची पार ऐशी की तैशी केली आहे. पण याबाबत मनमोहन सिंग यांचे काही म्हणणे नाही. त्यांचा आक्षेप आहे तो राष्ट्रवाद आणि भारतमाता की जय म्हणण्यावर. असो. पाकिस्तान जिंदाबाद किंवा देशाचे तुकडे पडो, असे म्हणणे किंवा अतिरेक्यांचे गोडवे गाणे, देशातील बहुसंख्याकांच्या धर्म, श्रद्धेची निंदा करणे वगैरे वगैरे करताना काही मंडळींना असुरी आनंद वाटतो. त्यांच्यासाठी ती प्रचंड क्रांती असते. या असल्या लोकांच्या पाठीमागे आहे तरी कोण? यापाठीमागे, देशद्रोही शक्तींची प्रचंड ताकद आहे. जी वैचारिक आणि कमालीच्या भावनात्मक आपुलकीच्या खोटारडेपणावर उभी राहिली आहे. यांच्या जाळ्यात भलेभले अडकलेले आहेत. का? कारण, हे लोक निवडक समाजगटाला सांगतात की, येणार्‍या काळात तुम्हाला पुन्हा चातुर्वर्ण्यामध्ये गुलाम केले जाणार आहे. संविधानात तुम्हाला दिलेले हक्क पुन्हा काढून टाकले जाणार आहे. तुमचे अस्तित्व मिटवणार आहेत. या धादांत खोट्या प्रचाराला झोपडपट्टीतील सोडाच पण उच्च पदावर असलेल्या व्यक्तीही फसत आहेत. या भितीला काय म्हणावे की, कळते पण वळत नाही, ही त्यांची मानसिकता म्हणावी. विरोधासाठी विरोध करत ही मंडळी देश, समाजाचे नुकसान करत आहेत. दुधाचे दात न पडलेली मुलं देशाच्या पंतप्रधानांना मारण्याची भाषा करतात, कामधंदे सोडून मुंबईतली तरुण मुलं-मुली कम्युनिझमसाठी दिल्लीच्या शाहीनबागेमध्ये डफली घेऊन जातात. विशिष्ट व्यासपीठावर देशविरोधी घोषणा देतात. या सगळ्यांच्या विचारांची पद्धत एकच आहे, ती म्हणजे देश-धर्म गेले **मध्ये, आम्हाला समाज फोडू द्या. ही मंडळी मूठभर आहेत. पण विनाश करण्यासाठी विष चिमूटभरही चालते, ही तर विषवल्ली आहे. या विषवल्लीची नांगी ठेचायलाच हवी.




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121