गोविज्ञानात 'कोरोना'चा संसर्ग रोखण्याचे सामर्थ्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |

Coronavirus-can-be-treate



'कोरोना' संसर्गाचा उद्रेक सुरू झाल्याने जगातील अनेक संशोधन संस्था त्यावरील उपाययोजनांच्या मागे लागल्या आहेत. याबाबत गेली काही वर्षे गोविज्ञान क्षेत्रात जे प्रयोग झाले, त्यावरुन असे निश्चितपणे म्हणता येईल की, ही आव्हाने पेलण्यास गोविज्ञान समर्थ आहे.

 
 

'कोरोना' संसर्गजन्य साथीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चीनमध्ये तर 'कोरोना'ने कहर केला असून शहरेच्या शहरे ओस पडली आहेत. 'कोरोना'च्या संसर्गाचे स्वरूप आणि पसरण्याचा वेग लक्षात घेता, त्याचा उद्रेक असलेल्या चीनमध्ये, तर आणीबाणीची गरज आहेच, पण त्याची लागण झालेल्या इतर काही देशांतही आणीबाणीची गरज आहे आणि त्याचा काहीही संसर्ग झालेला नाही, अशा भारतासारख्या देशातही त्याबाबत प्रतिबंधात्मक आणीबाणीची गरजेची म्हणावी लागेल. असे संसर्गाचे उद्रेक ज्या ठिकाणी आहेत, तेथेच ते नियंत्रित करावे लागतात. पण, चीनसारख्या महासत्तेचा दावा करणार्‍या देशाला आज तरी तो नियंत्रित करणे अशक्य झाले आहे. सार्‍या जगानेच मदत केल्यावर कदाचित तेथे तो नियंत्रित होईलही, पण तशा आशावादावर थांबण्याची सध्याची वेळ नाही.

 
 

२६ वर्षांपूर्वी सूरत येथे प्लेगची साथ पसरली होती आणि तेव्हा तेथे आणीबाणी जाहीर करून तो संसर्ग तर आटोक्यात आणला होताच, पण सार्‍या शहरातील छोट्यात छोटा कोपराही विनास्वच्छतेचा ठेवला नव्हता. त्यातून सार्‍या देशाने एवढाच संदेश घेतला की, आरोग्य आणीबाणी जाहीर केल्यानंतर अशी महाभयंकर साथही आटोक्यात आणता येते. या विषयाकडे एक आदर्श उपक्रम अशा दृष्टीने बघितले गेले. पण, सूरतमध्ये तशी काळजी घेतली गेली नसती तर सार्‍या देशात ती साथ परसली असती.

 
 

गोमूत्रातील 'अ‍ॅण्टिबायोटिक्स'ला अमेरिकन पेटंट

असा हा जगासाठी आव्हानात्मक ठरलेला 'कोरोना' संसर्गाचा उद्रेक सुरू झाल्याने जगातील अनेक संशोधन संस्था त्यावरील उपाययोजनांच्या मागे लागल्या आहेत. याबाबत गेली काही वर्षे गोविज्ञान क्षेत्रात जे प्रयोग झाले, त्यावरुन असे निश्चितपणे म्हणता येईल की, ही आव्हाने पेलण्यास गोविज्ञान समर्थ आहे. यासंबंधीचे सारे प्रयोगही सोपे आहेत, पण ते करावे लागतील. ते प्रत्यक्षात आणण्याचे तीन टप्पे आहेत. एक टप्पा असा आहे की, अशा उद्रेकाच्या शक्यता दिसत असतानाच्या काळात कोणालाही पडसे, खोकला आणि बारीक ताप न येण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या संदर्भात एक कपभर पाण्यात एक चमचा देशी गाईचे गोमूत्र किंवा गोमूत्र अर्क टाकून त्याच्या गुळण्या केल्यास वरील त्रास आटोक्यात येईल. अलीकडे हा गोमूत्र अर्क आयुर्वेद औषधाच्या दुकानात मिळतो. 'गोमूत्र अर्कात अ‍ॅण्टिबायोटिक क्षमता आहे' अशा आशयाचे अमेरिकन पेटंट अनुसंधान संस्था देवळापार, नागपूर या संस्थेला मिळाले आहे. त्यावर सखोल विचार केल्यास असे लक्षात येईल की, पेनिसिलीनचा शोध १९२८ मध्ये लागला. त्यावेळेपासून ते वापरात आहे. सध्या ते अ‍ॅण्टिबायोटिक्सच्या ज्या ज्या स्वरूपात वापरले जाते, त्याच्या मर्यादा म्हणजे त्याचा वापर वाढविल्यावर त्याची प्रतिकारक्षमता कमी होते. त्यामुळे त्याची मात्रा अधिक घ्यावी लागते. ती मात्राअधिक घेण्याने शरीरात अजून काही अडचणी उभ्या राहू शकतात. पण गोमूत्र अर्काबाबत तसे होत नाही. त्यामुळे 'डीएनए'चा 'डॅमेज'ही रोखता येतो. शरीरातील विषारी घटक घटतात. वरीलप्रमाणे गुळण्या करणे, एक कप पाण्यात एक चमचा गोमूत्र अर्क घालून तो घेणे आणि नाकात पंचगव्यघृत एक एक थेंब घालावे. याने वरील त्रास आटोक्यात येतात. आयुर्वेदात वरील संसर्गाच्या लक्षणावर अनेक उपाय आहेत. आपापल्या सल्लागार वैद्यांकडून उपाययोजनाही तेवढ्याच उपयोगाच्या ठरणार आहे. गोमूत्रावर अशी पेटंट्स मिळवण्यात गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे सुनील मानसिंगका (संपर्क क्रमांक ०७१२-२७७२२७३) यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

 
 

२६ वर्षांपूर्वीचा 'सूरत पॅटर्न' अवलंबिण्याची गरज

चीनमधील 'कोरोना'च्या उद्रेकाचे मोठे कारण आहे ते आजूबाजूची अस्वच्छता. घराभोवतीचे पाण्याचे साठे वरील संसर्गाला निमंत्रण देणार ठरतात. पण, खेड्यातील आणि शहरातील सांडपाण्याचे प्रत्येक डबके, मोठे तलाव, उघडी गटारे, दिसायला बंद असणारी पण काही ठिकाणी उघडी असणारी गटारे, घराभोवतीच्या बागा आणि सार्वजनिक बागा यातील पाणी साठणार्‍या जागा त्या संसर्गाचे कारण ठरतात. अलीकडे प्लास्टिकचा कचरा सुरू झाल्यापासूनही ओढे आणि नद्यांमधील वाहते प्रवाह कमी झाले आहेत आणि ते प्रवाह त्या पात्राच्या चार-पाचपट पसरून दलदली निर्माण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरातील कचर्‍याचे ढीग, काहीशा सखल भागात दीर्घकाळ राहिलेले ओल्या कचर्‍याचे साठे हे तर वरील संसर्गाचे मोठे कारण असतात. त्यावर नियंत्रण आणण्याचे काम गोआधारित शेतीत जे 'अमृतपाणी' किंवा 'जीवामृत' वापरले जाते, ते वारंवार त्या ढिगावर आणि त्या दलदलीवर शिंपडले तर त्यातील संसर्ग कमी होतो.

 
 

अजित परब यांचे स्पृहणीय प्रयोग

याबाबत वेंगुल्याचे अजित परब यांनी केलेले प्रयोग अतिशय स्पृहणीय आहेत. त्यांनी केलेला प्रयोग हा 'जीवामृता'च्या आधारे केलेला आहे. सावलीच्या ठिकाणी २०० लिटरचे एक पिंप ठेवून त्यात १५ किलो देशी गाईचे ताजे शेण, दहा लिटर देशी गाईचे गोमूत्र, एक किलो बेसन, कडुनिंब किंवा वड यांच्या झाडाखालील एक मूठ माती त्याचप्रमाणे कडुलिंबाची वाळून खाली पडलेली एक सूपभर पाने त्या पिंपात टाका. बाकी पिंप पाण्याने भरा. ते पिंप वर सहा, सात इंच जागा उरेल अशा पद्धतीने भरून घ्यावे. दिवसातून तीन-चार वेळा असे दोन दिवस ढवळा. हे द्रावण घाणीचे ढीग, गटारे, दुर्गंधीची डबकी येथे टाका. हे द्रावण दर १५ दिवसांनी पुन्हा पुन्हा मारावे. जेथे ही घाण असेल तेथील ती घाण तर जातेच, पण तेथे वनस्पती उगवतात. परब यांनी अनेक नगरपरिषदा आणि महापालिका येथे हा प्रयोग केला आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८०५०४९१०८७ असा आहे. यातील 'जीवामृता'पासून वरील स्वच्छतेचे प्रयोग करण्याची प्रेरणा त्यांनी सुभाष पाळेकर यांच्याकडून घेतली आहे.

 
 

'अमृतपाण्या'चे प्रयोगही अनेक ठिकाणी करण्यात आले आहेत. यासाठी 'अमृतपाणी' करण्याची पद्धती म्हणजे देशी गाईचे २० लिटर गोमूत्र, २० किलो ताजे शेण आणि अडीचशे ग्रॅम गूळ एका मातीच्या माठात किंवा सिमेंटच्या टाकीत घालावे. ते त्या टाकीत सात ते दहा दिवस ठेवावे. आठ दिवस ते वारंवार ढवळावे. आठ दिवसांनी त्यावर बुडबुडे दिसतील. नंतर ते २०० लिटर पाण्यात घालून घाणीच्या ढिगावर फवारावे. ढीग मोठे असतील तर दर १५ दिवसांनी फवारावे. ही पद्धती गोविज्ञान अनुसंधान केंद्राची आहे. गरजेनुसार हे 'अमृतपाणी' तेच प्रमाण घेऊन कमी किंवा अधिक करता येते.

 
 

उघडे गटार आणि घाणीचा ढीग हेच रोगराईला आमंत्रण

हे प्रयोग 'अमृतपाण्या'चे असोत किंवा 'जीवामृता'चे असोत. आपल्या बाजूबाजूला कोठेही घाणीचा साठा असता नये, यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. चौकाचौकातील घाण स्वच्छ करणे, गल्लीबोळातील अंशत: उघडी गटारेही स्वच्छ करणे याचे महत्त्व अन्यथाही असतेच. पण, सध्या जगभर 'कोरोना'मुळे चिंतेची स्थिती आहे. ती अजून लक्षात आलेली असो किंवा नसो, सार्‍या जगात सध्या 'सूरत पॅटर्न'ची आवश्यकता आहे.

 
 

यातील प्रत्येक टप्प्याला महत्त्व आहे. आपण जगाने आरोग्य आघाडीवर आणीबाणी जाहीर केली, असे म्हटले तर तसे लगेच होईल असे नाही आणि शहरपातळीवरही तसे लगेच केले जाईल असे नाही. पण, किमान आपण ज्या परिसरात राहातो, तेथे तरी ती करावे. प्रत्येकाचे पडसे आणि खोकला जाणे हे जसे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे कोणालाही खोकला नसणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. तसे आपल्या भोवती घाणीचा ढीग स्वच्छ होणे जसे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे एकही घाणीचा ढीग किंवा दलदलीचे डबके असता नये. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे.

 
 

हे तर युद्धाच्या नव्या तंत्राचे आव्हान

सध्या जगभर समस्या निर्माण केलेल्या 'कोरोना' हा व्हायरसच्या व्याधीवर अजून निश्चित स्वरूपाचा इलाज पुढे आलेला नाही. पण, त्यावर आपण इलाज करू शकतो, असे अनेक आयुर्वेदतज्ज्ञांनी सांगितले आहे. यापूर्वी अशी अनेक आव्हाने आयुर्वेदाने पेलली आहेत. तरीही सध्या जगातील प्रत्येक संशोधनाला महत्त्व देणे आणि त्याच्या प्रयोगावर लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थात, हा सारा पुढचा विषय आहे. यातील गंभीर बाब म्हणजे यापूर्वी देवी, कांजिण्या, पोलिओ, फ्लू असे संसर्गाचे रोग होत असत. देवीची लस ही गाईपासूनच तयार केली होती व ५० वर्षांच्या प्रयत्नांनंतर ती घालवण्यात यश मिळाले आहे. पण, येणारा काळ हा फक्त नैसर्गिक संसर्गव्याधीचा राहिलेला नसून सूक्ष्मजंतूंच्या साहाय्याने युद्धे करण्याचा आहे. गेल्या शतकातील दोन महायुद्धे रणगाडे, विमानातूनबॉम्बहल्ले, भूसुरुंग आणि शेवटी अणुबॉम्ब हल्ला यातून झाले. पण, त्या अस्त्रांचे काही अप्रूप राहिले नसून किटाणूयुद्ध, संसर्गव्याधी युद्ध अशा स्वरुपात ते रुपांतरीत होऊ लागले. देशोदेशी पाठवली जाणारी धान्याची मदत यातूनही 'पार्थेनियम' म्हणजेच 'काँग्रेस गवत' म्हणजेच 'गाजरगवत' असे पाठविण्याचे प्रकार झाले आहेत. गेली ६० वर्षे भारत त्या युद्धाचाच बळी ठरला आहे. गाजरगवताने या देशाची २० टक्के पीकक्षमता कमी झाली आहे. 'कोरोना' हे कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे, हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही, पण तोही संसर्गव्याधी युद्धाचाच प्रकार असल्याचे जाणकारांचे मत आहे. यातील बरेचसे मुद्दे हे युद्धकौशल्य, संरक्षणशास्त्र, मुत्सद्देगिरी याच्याशी संबंधित आहेत. पण, गेल्या काही वर्षातील गोविज्ञानाच्या संशोधनाच्या आधारे यातील कठीणात कठीण आव्हाने पेलण्याचे सामर्थ्यनिर्माण झाले आहे, हे निश्चित.


- मोरेश्वर जोशी

९८८१७१७८५५

@@AUTHORINFO_V1@@