डिजिटल स्वरूपातील संस्कारक्षम कथांचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |

digital edition of impres
 
 
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’च्या मूल्यशिक्षण उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संस्कारक्षम कथांच्या डिजिटल स्वरूपाचे लोकार्पण सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि भजनसम्राज्ञी अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळ सभागृहात विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे युट्यूब आणि फेसबुक माध्यमाद्वारे प्रसारणही करण्यात आले.
 
 
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या या नात्याने बोलताना त्या म्हणाल्या, “कोरोना महामारीच्या काळात देशातील परिस्थिती अतिशय बिकट होईल. उपासमारीमुळे भाकरीच्या तुकड्यासाठी माणसा-माणसांमध्ये संघर्ष होईल, असे भाकित प्रसिद्ध अर्थतज्ञ नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्यासह अनेकांनी केले होते, पण प्रत्यक्षात देशातील कुणीही उपाशी झोपणार नाही, असा संकल्प घेऊन देशाच्या अनेक भागांत कार्यरत सेवाव्रतींच्या उदारतेचे दर्शन आपल्याला घडले. संस्कारक्षम कथांचा अमूल्य ठेवा दृकश्राव्य माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना देण्याच्या प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना प्रत्येक संस्कृतीप्रेमी संवेदनशील व्यक्तीने साथ द्यावीे. प्रतिष्ठानच्या संस्कार जागरणाच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची मला संधी द्यावी,” अशी विनंतीही त्यांनी आयोजकांना केली.
 
 
‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ गेली १७ वर्षे मूल्यशिक्षणाच्या प्रचार-प्रसाराचे काम करीत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा उपक्रम महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि केरळ राज्यांतील ९०० शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. ध्वनिचित्रण रूपातील संस्कारक्षम कथांचा लाभ या उपक्रमात सहभागी झालेल्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त-सचिव मोहन सालेकर यांनी यावेळी बोलताना दिली.
 
या कार्यक्रमात साहाय्यक पोल्रर्‍स आयुक्त अविनाश धर्माधिकारी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजय मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ठाण्याच्या ‘नुपूर नृत्य कलापथका’ने सादर केलेल्या नृत्याविष्कार सणांचा या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे अतिशय नेटके संचालन दीपिका गावडे यांनी तर अस्मिता आपटे यांनी प्रास्ताविक सादर केले.
- उज्ज्वला शेट्ये
@@AUTHORINFO_V1@@