रा.स्व.संघाचे मानपाडा नगर संघचालक प्रभाकर जोशी यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020
Total Views |

joshi_1  H x W:




तरुणाईशी मोकळेपणाने संवाद साधण्यात होता त्यांचा पुढाकार


ठाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाणे, मानपाडा नगराचे संघचालक प्रभाकर लक्ष्मण जोशी यांचे वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी कोरोनाग्रस्त झाल्याने शनिवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. रा.स्व. संघाच्या वर्तुळात जीवनात अण्णा म्हणून परिचित असलेले प्रभाकर जोशी यांना त्रास होत असल्याचे लक्षात येताच स्वतःहून ठा.म.पा. संचालित ग्लोबल रुग्णालयात दाखल झाले होते. आपण लवकरच घरी येऊ असे त्यांनी कार्यकर्त्यांना कळवले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशिरा त्यांच्यावर वागळे इस्टेट येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


मूळचे जळगाव येथील प्रभाकर जोशी यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर प्रभाकर जोशी यांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण करून त्यांनी वकिलीला सुरुवात केली होती. व सध्या ते जिल्हा सत्र न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष शिक्षित असलेल्या अण्णा जोशी यांनी निवृत्तीनंतर रा. स्व.संघाच्या कामात स्वतःला झोकून दिले होते. मानपाडा नगराचे संघचालक म्हणून कार्यरत असणारे अण्णा सामान्य स्वयंसेवकांच्या पालकत्वाची भूमिका आपुलकीने पार पाडत होते.


दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या अण्णांचा हात सदैव मदतीसाठी पुढे असायचा. तरुणाईशी मोकळेपणाने संवाद साधण्यात त्यांचा पुढाकार होता. कुठल्याही कामासाठी या प्रभाकर लक्ष्मण जोशींकडे निःसंकोचपणे कधीही यायचे, असे त्यांचे सांगणे होते. प्रभाकर जोशी यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.
@@AUTHORINFO_V1@@