श्रीनगर : श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात मोठे यश मिळाले आहे. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरचा खात्मा करण्यात यश आले आहे. सैफुल्लाह असे खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. यासोबतच एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात हिज्बुल मुजाहिद्दीनचे दोन टॉप दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एक जॉईंट ऑपरेशन सुरू केले. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले.पोलीस महानिरीक्षक काश्मीर रेंज विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या सीमेवर रंगरेथ भागात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य ऑपरेशन कमांडर डॉ. सैफुल्लाह याला ठार करण्यात आले आहे. यावेळी एका संशयितालाही अटक करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. मई रियाज नायकूची हत्येनंतर यंदा सुरक्षा दलाला आलेले हे दुसरे मोठे यश आहे.