आक्षेपार्ह विधान भोवले; मिलिंद देवरा विरोधात गुन्हा दाखल

    21-Apr-2019
Total Views | 58




मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने देवरा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भुलेश्वर येथील भाषणात त्यांनी जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून शिवसेनेने देवरा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

 

देवरा यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात सेनेच्या वतीने अ‍ॅड. धर्मेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी ८ एप्रिल रोजी देवरांविरोधात आयोगाकडे तक्रार केली होती. त्यासोबत देवरा यांच्या भाषणाची सीडीही पाठवण्यात आली होती. या भाषणाच्या क्लिपनुसार देवरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे दिसून येत असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले होते.

 

निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात खोटे वक्तव्य केल्याप्रकरणी भादंवि १७१ आणि दोन समुदायांमध्ये निवडणूक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल भादंवि १२५ या कलमांनुसार एल टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून सुनील नारकर यांनी पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे कणकवली तालुक्यातील पियाळी गावचे आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नारकर हे सन १९९७ मध्ये कोकण रेल्वेमध्ये रत्नागिरीत क्षेत्रीय ट्रॅफिक व्यवस्थापक पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी मडगाव येथे वरिष्ठ क्षेत्रीय वाहतूक व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. पुढे बेलापूर येथे कोकण रेल्वे मुख्यालयामध्ये मुख्य वाणिज्य प्रबंधक म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. आता पदोन्नतीने त्यांची कोकण रेल्वेचे ..

पालघरमधील १० टायर उद्योगांना टाळे - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती; प्रदूषणाच्या तक्रारीवरून कारवाई

पालघरमधील १० टायर उद्योगांना टाळे - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती; प्रदूषणाच्या तक्रारीवरून कारवाई

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यातील ८ उद्योग बंद आहेत. अन्य दोनपैकी एका उद्योगात भीषण आग लागल्यामुळे तो बंद आहे, तर दुसऱ्या उद्योगाला अंतरिम नोटीस देण्यात आली असून, त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. त्याआधारे पुढील कारवाई होणार आहे, अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121