जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर एकीकडे शांतीची भाषा करणारे पाकिस्तान दुसरीकडे सीमा भागांमध्ये आपली कट-कारस्थाने चालूच ठेवले आहेत. भारतीय लष्कराने राजस्थानच्या श्री गंगानगर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करून भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे ड्रोन पाडले. लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करणारे हे ड्रोन पाडण्यात आले, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितली. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "शनिवारी सकाळी ५.३०च्या सुमारास श्रीगंगानगरजवळ हिंदुमलकोट सीमेवर एक ड्रोन भारतीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. भारतीय लष्करी नजर त्यावर पडताच त्यांनी गोळीबार सुरु केली आणि ते ड्रोन पुन्हा पाकिस्तानी हद्दीकडे वळले."
२६ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानच्या भूमीवरील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकनंतर भारतीय सुरक्षा दलांकडून पाडण्यात आलेले हे पाकिस्तानचे तिसरे ड्रोन आहे. २६ फेब्रुवारीला सकाळी भारतीय लष्कराने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात घुसखोरी करणारे पाकिस्तानचे पहिले ड्रोन पाडले होते. गेल्या सोमवारी राजस्थातील बीकानेर येथे दुसरे ड्रोन पाडण्यात आले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat