धर्मांतराचा सूत्रधार जमालुद्दीनच्या संपत्तीवर फिरला योगींचा बुलडोझर

    08-Jul-2025   
Total Views | 22

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याच्यावर मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. बलरामपूरमधील त्याच्या ४० खोल्यांच्या आलिशान हवेलीवर ९ बुलडोझर चालवण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जमालुद्दीनवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते.

छांगूर बाबाच्या आलिशान हवेलीतील २० खोल्या आणि ४० फूट लांब आणि तितकाच रुंद हॉल मंगळवार सायंकाळपर्यंत जमीनदोस्त करण्यात आला आहे. त्यानंतर आज बुधवारी उर्वरित १० खोल्यांचे पाडकाम होईल. हवेलीत ७० हून अधिक खोल्या आणि हॉल आहेत. त्यापैकी ४० खोल्या असलेला भाग बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. छांगूर बाबा येथूनच धर्मांतराचे नेटवर्क चालवत असे, असा उत्तर प्रदेश एटीएसचा दावा आहे. तथापि, ही हवेली त्याची प्रेयसी नीतू उर्फ नसरीन हिच्या नावावर आहे. जमालुद्दीनने स्वतः नीतूचे धर्मांतर करून तिचे नाव नसरीन ठेवले असल्याचेही पुढे आले आहे.

ही हवेली उत्तौला-मानकापूर मुख्य रस्त्यावर आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्चून ३ बिघा जमिनीवर बांधण्यात आली आहे. त्यात १० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हवेलीभोवतीच्या भिंतीवर तारा टाकण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी त्यातून विद्युत प्रवाह जात असे जेणेकरून कोणीही कुठूनही आत येऊ नये. मुख्य प्रवेशद्वारापासून हवेलीपर्यंत जाण्यासाठी ५०० मीटरचा खाजगी रस्ता बांधण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचे होते कठोर कारवाईचे निर्देश

जमालुद्दीनच्या धर्मांतर जाळ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते. एक्सवर त्य़ांनी म्हटले की, एक्स वर पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, आमचे सरकार आमच्या बहिणी आणि मुलींच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी जलालुद्दीनच्या कारवाया केवळ समाजविरोधी नाहीत तर देशविरोधी देखील आहेत. उत्तर प्रदेश सरकार कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही उदारता दाखवणार नाही. आरोपी आणि त्याच्या टोळीशी संबंधित सर्व गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. राज्यात शांतता, सौहार्द आणि महिलांची सुरक्षितता बिघडवणाऱ्यांना कोणतेही स्थान नाही. त्यांना कायद्यानुसार अशी शिक्षा दिली जाईल की ती समाजासाठी एक उदाहरण बनेल.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121