खुशखबर : निर्माणाधीन घरावरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के

    24-Feb-2019
Total Views | 84



 



नवी दिल्ली : आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात केंद्र सरकारने घरांच्या किमतींवरील जीएसटी करात घसघशीत सवलत देत देशभरातील तमाम घर खरेदीदारांना खुश केले आहे. निर्माणाधीन घरांवरील जीएसटी हा १२ टक्क्यांवरून ५ टक्के तर परवडणार्‍या घरांवरील जीएसटीदेखील ८ टक्क्यांवरून थेट १ टक्क्यापर्यंत आणण्यात आला आहे.

 

रविवारी झालेल्या जीएसटी परिषदेनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. या सवलतीमुळे घर खरेदीदारांसाठी मोठी आनंदवार्ता मिळाली आहे. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी हे बदल करण्यात आले असून करकपातीचा लाभ अधिकाधिक लोकांना घेता येईल व बांधकाम क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होईल, असे अरूण जेटली यांनी सांगितले. कररचनेतील या बदलांमुळे विकासकांना ‘इनपुट टॅक्स क्रेडीट’करिता दावा मात्र करता येणार नाही. जीएसटी परिषदेच्या या निर्णयानुसार, निर्माणाधीन (अंडर कन्स्ट्रक्शन) घरांवर सध्या असलेला १२ टक्के इतका वस्तू आणि सेवा कर ७ टक्क्यांनी कमी करून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. तसेच, परवडणार्‍या (अ‍ॅफोडेर्बल) घरांवरील सध्या असलेला ८ टक्के इतका कर हा ७ टक्क्यांनी कमी करून अवघ्या १ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या सर्वसामान्य घरखरेदीदारांना या करसवलतीचा मोठा फायदा होणार आहे.

 

‘मेट्रो’ शहरांत ६० चौ. मीटर्सपर्यंतची घरे ‘अ‍ॅफोडेर्बल’

 

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद, बंगळूरू इ. ‘मेट्रो’ शहरांमध्ये ६० चौरस मीटर्सपर्यंत क्षेत्रफळाची घरे ‘परवडणारी’ मानली जातील तर उर्वरित प्रदेशातील (नॉन-मेट्रो) ९० चौ. मीटर्सपर्यंतची घरे परवडणारी मानली जातील. या दोन्हीकडील घरांची प्रत्येकी किंमत ४५ लाख रूपये इतकी असेल, असे जेटली म्हणाले. तसेच, हे नवे दर १ एप्रिल, २०१९ म्हणजे येत्या आर्थिक वर्षापासून लागू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121