लोकमानसाची गरज : खरी आणि बनवलेली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |


asf_1  H x W: 0


'इव्हानहो' ही अगदी आजही एक लोकप्रिय साहित्यकृती मानली जाते आणि हे फक्त इंग्रजी भाषेतच नाही; युरोपभर सर्वत्र रॉबिन हुड लोकप्रिय आहे. सोव्हिएत रशियन राज्यकर्त्यांना तर श्रीमंतांना लुटून गरीबांना मदत करणारा रॉबिन हुड हा आपलाच पूर्वज वाटला.


टेरॉन इगर्टन हा एक तरुण लोकप्रिय चित्रपट नायक आहे. त्याचा अलीकडचा सर्वाधिक 'हिट' चित्रपट आहे 'रॉबिन हुड.' या चित्रपटात रॉबिन हुड हा नायक कु्रसेड युद्धावरून परतलेला एक अनुभवी, तरबेज योद्धा अशा स्वरूपात दाखवलेला आहे. कु्रसेड युद्धे ही, जेरूसलेम या पवित्र शहरावर कुणाचा ताबा असावा, या प्रश्नावरून मुसलमान आणि ख्रिश्चन यांच्यात झालेली घनघोर युद्धे होती. अशा धर्मयुद्धातला योद्धा म्हणून रॉबिनला पेश करण्यात दिग्दर्शकाला काय सूचित करायचं आहे, ते उघडच आहे. काही वर्षांपूर्वी इंग्रजी चित्रपटांत अशी लाट होती की, कथानकात एखादं मुसलमान पात्र दाखवायचं. हे पात्र सज्जनच असायचं, दुर्जन, खलनायक नव्हे. तर त्या लाटेत तेव्हाच्या एका रॉबिन हुड चित्रपटात, रॉबिनचा एक सहकारी हा आवर्जून मुसलमान दाखवण्यात आला होता. पण आज खुद्द रॉबिनलाच 'कु्रसेडर योद्धा' दाखवलं जातंय. समाजमन कोणत्या दिशेला झुकतंय किंवा त्याने कोणत्या दिशेला झुकावं, असं दिग्दर्शकाला वाटतंय, हे यावरून दिसतं. रॉबिन हुड या माणसाच्या अस्तित्वाला पक्का ऐतिहासिक पुरावा नाही. रॉबिन हुड किंवा रॉबर्ट होड या वीरपुरुषाची स्तुती करणारे काही पोवाडे आहेत. त्यांचा काळ आहे चौदावे शतक. त्या पोवाड्यांमधल्या वर्णनावरून असं दिसतं की, रॉबिन हुड हा इंग्लंडचा नॉटिंगहॅमशायर या परगण्यातला एक तरुण शेतकरी होता. इंग्लंडचा राजा रिचर्ड हा कु्रसेड युद्धावर गेलेला होता नि त्याच्या गैरहजेरीत त्याचा भाऊ जॉन याने राज्यकारभाराचे धिंडवडे काढले होते. प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला होता. गरीबांना कुणी वाली नव्हता. सरदार मंडळी आणि धार्मिक नेते ख्यालीखुशालीत दंग होते. युवराज जॉन आणि त्याचे ठिकठिकाणचे चेले-चपाटे-चमचे यांनी सर्वसामान्यांचे जिणे असह्य केले होते. अशा स्थितीत रॉबिन या तरुणाने नॉटिंगहॅमच्या कोतवालाविरुद्ध बंड पुकारलं. रॉबिन स्वत: उत्कृष्ट तिरंदाज, नेमबाज आणि तलवारबाज होता. साहजिकच त्याच्याभोवती त्याच्याचसारखी दोस्त मंडळी जमली. कोतवालाने त्यांना पुंड म्हणजे 'वाँटेड' म्हणून जाहीर केलं, तेव्हा त्यांनी शरवुड किंवा शेरवुड या दाट जंगलाचा आश्रय घेतला. हे लोक अन्यायी श्रीमंतांना सरळ लुटायचे आणि ती संपत्ती गोरगरीबांना वाटून टाकायचे.

 

रॉबिन हुडच्या चरित्रात्मक पोवाड्यांमधला मूळ कथाभाग हा एवढाच आहे. त्या रॉबिनचे आई, बाप, कुटुंब, शिक्षण, जीवन, मृत्यू, काळ यापैकी कशाचाही उल्लेख नाही. पण, पंधराच्या शतकात, इंग्लंडचा राजा पाचवा हेन्री याच्या ढिसाळ कारभारामुळे देशभरात प्रचंड भ्रष्टाचार आणि बजबजपुरी माजली आणि समाजाच्या त्या विशिष्ट अवस्थेत एकदम रॉबिन हुडचे पोवाडे पुढे आले आणि पाहता-पाहता अत्यंत लोकप्रिय झाले. तेव्हापासून आतापर्यंत रॉबिन हुडवर इतक्या कथा-कादंबऱ्या-काव्य आणि नाटकं रचली गेली आहेत नि प्रत्येक लेखक-कवीने आपल्या कल्पनेने मूळ कथेत इतकी भर घातली आहे की, मूळ कथा कोणती तेच आता कळेनासं झालं आहे. आपण जसं अमुक ते काम म्हणजे अगदी शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे किंवा गोवर्धन पर्वत उचण्यासारखं आहे, असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर राम आणि कृष्ण असतातच असं नव्हे; पण रामायण-महाभारताचा त्या कथा आपल्या जाणिवेत इतक्या मुरून गेल्या आहेत की, एखाद्या अवघड कामाबद्दल आपण सहजपणे असं बोलून जातो. अगदी तसंच रॉबिन हुड ही व्यक्तिरेखा इंग्रजी समाजाच्या जाणिवेत पार मुरून गेली आहे. खुद्द शेक्सपिअरच्या नाटकांमधल्या पात्रांच्या तोंडी संदर्भपरत्त्वे रॉबिन हुडचा उल्लेख येतो. सर वॉल्टर स्कॉट या विख्यात कादंबरीकाराने तर त्याच्या 'इव्हानहो' या कादंबरीत रॉबिन हुड ही व्यक्तिरेखाच आणली. 'इव्हानहो' ही अगदी आजही एक लोकप्रिय साहित्यकृती मानली जाते आणि हे फक्त इंग्रजी भाषेतच नाही; युरोपभर सर्वत्र रॉबिन हुड लोकप्रिय आहे. सोव्हिएत रशियन राज्यकर्त्यांना तर श्रीमंतांना लुटून गरीबांना मदत करणारा रॉबिन हुड हा आपलाच पूर्वज वाटला. १९८५ साली ऑगस्ट आणि लुई या ल्युमिळ बंधूंनी जगातला पहिला चलत् चित्रपट- मूव्ही बनवला. तो अर्थातच मूकचित्रपट होता. १९०० साली चित्रपटाला आवाजाची जोड मिळून 'मूव्ही' हा 'टॉकी' झाला. अर्थात पूर्ण लांबीचा चित्रपट हा बोलपट व्हायला अजून काही वर्षं गेली. पण, पहिल्यावहिल्या मूक चित्रपटांमध्ये रॉबिन हुड होताच. १९०८ साली 'रॉबिन हुड अ‍ॅण्ड हिज मेरी मेन' हा मूकपट पडद्यावर आला. नंतर १९२२ साली डग्लस फेअरबँक या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याचा 'रॉबिन हुड' हा मूकपट आणि १९३८ साली एरॉल फ्लिन या तितक्याच लोकप्रिय नायकाचा 'दि अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ रॉबिन हुड' हा बोलपट आला. हे दोन्ही चित्रपट जगभर इतके गाजले की, आजही रॉबिन हुड म्हटलं की, चित्रपटरसिकांना डग्लस फेअरबँक आणि एरॉल फ्लिनच आठवतात. १९०८ पासून आज २०१९-२० पर्यंत प्रत्येक दशकात फिचर फिल्म, शॉर्ट फिल्म, टीव्ही मालिका अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दर दोन-तीन वर्षांनी रॉबिन हुडची कथा मोठ्या किंवा छोट्या पडद्यावर येतेच आहे. लोकप्रिय होतेच आहे. त्या-त्या दशकातले लेखक-दिग्दर्शक आपापल्या तत्कालीन सामाजिक गरजेनुसार रॉबिनच्या कथेला वळण देत आहेत. ब्रिटिश-अमेरिकन लेखक-दिग्दर्शक रॉबिनला लोकशाहीचा रक्षणकर्ता नि हुकूमशाहीला आव्हान देणारा दाखवत होते, तर साम्यवादी लेखक त्याला शोषित-वंचितांचा त्राता दाखवत होते. सध्या त्याला धार्मिक अतिरेकी आणि कॉर्पोरेट जगातले अतिश्रीमंत यांच्याविरुद्ध लढणारा, असं दाखवलं जातंय.

 

चित्रपटापूर्वी साहित्य, नाट्य यांच्यामध्येही त्याचा असाच काळानुरूप उपयोग करून घेण्यात आलेला होता. इंग्लंडच्या इतिहासात 'हंड्रेड इयर्स वॉर', 'वॉर ऑफ रोझेस' वगैरे कुप्रसिद्ध कालखंड आहेत, जेव्हा या उत्पाती घटनांमुळे समाजाचं नीतिधैर्य पार खचलं होतं. ते पुन्हा उंचवावं म्हणून तत्कालीन साहित्यिक-कवी-नाटककार यांनी रॉबिन हुडचा उपयोग करून घेतला होता. तात्पर्य, कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा ललित साहित्याचा समाजमनावर निश्चितपणे प्रभाव पडत असतो. आधुनिक काळात या प्रकारांना चित्रपट, दूरदर्शन आणि आता इंटरनेटद्वारा व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर यांची जोड मिळालेली आहे. ही माध्यमं 'व्हिज्युअल' म्हणजे प्रत्यक्ष दृश्य दाखवणारी असल्यामुळे त्यांचा प्रभाव फार मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा आहे. ललित साहित्याचा आणि दृक्-श्राव्य माध्यमांचा हा प्रभाव सर्वात जास्त कुणी ओळखला असेल, तर तो साम्यवाद्यांनी. मुळातच मार्क्सच्या मांडणीत एक जबरदस्त 'अपील' आहे. मूठभर श्रीमंतांनी सगळी संपत्ती आपल्या हातात ठेवली आहे नि ज्या विशाल श्रमिक वर्गाच्या श्रमांमधून ही संपत्ती निर्माण होते, त्या श्रमिक वर्गाला त्या संपत्तीपासून वंचित ठेवून त्याचं शोषण चालवलं आहे. तेव्हा श्रमिकांनो, शोषितांनो, वंचितांनो बंड करा. या मूठभर श्रीमंतांना फेकून द्या आणि तुमच्या घामाच्या कमाईचे तुम्हीच मालक व्हा. या मार्क्सच्या मांडणीत सर्वसामान्य समाजाला आकर्षून घेण्याचं एक प्रचंड 'अपील' आहे.

 

साम्यवाद्यांनी या 'अपील'चा वापर करून जगभरचे साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार, गायक, अभिनेते, दिग्दर्शक यांना साम्यवादाच्या भ्रमजालात फसवलं. पाश्चिमात्त्य कलावंत या भ्रमजालातून लवकर बाहेर पडले. कालचे शोषित-वंचित आज सत्ताधारी बनले की, राजे-महाराजे यांच्यापेक्षाही पिसाट खुनी बनतात, याचं प्रत्यक्ष दर्शन त्यांनी स्टॅलिनच्या राजवटीत घेतलं. ते शहाणे बनले. आपल्याकडचे लेखक-कलावंत मात्र अजून त्याच भ्रमात आहेत. या कलावंतांकरवी साम्यवाद्यांनी आपल्या समाजात उपभोगवाद माजवला आहे. समाज अधिकाधिक ऐदी, आळशी, सुखवस्तू, चैनी, पोषाखी, नीतिबाह्य वर्तनात सुख मानणारा, पैसा हाच परमेश्वर मानणारा बनेल, याची त्यांनी अगदी काळजीपूर्वक योजना केलेली आहे. साहित्य, नाट्य, चित्रपट, दूरदर्शन वाहिन्या कुठेही पाहा. समाजाच्या सर्व प्रकारच्या वासना कशा उफाळतील, हेच पाहिले जात आहे. अशा प्रकारची ग्लानी ही नवी नाही. आतापर्यंत अशा अनेक ग्लानींमधून आपल्या समाजाला रामायण-महाभारत कथांनी खेचून बाहेर काढलंय. लंपटपणा टाकून पुन्हा पुरुषार्थी बनवलंय. साम्यवाद्यांना हेही माहिती आहे. म्हणूनच काल-परवा मरण पावलेल्या एका नटश्रेष्ठाचे रामायण-महाभारतावर टीका करणारे उद्गार पुनःपुन्हा 'हॅमर' केले जात आहेत. पाश्चिमात्त्य समाजाला आत्मभान यायला रॉबिन हुड असेल; तर आम्हाला आत्मभान द्यायला मानवतेचे सर्वश्रेष्ठ आदर्श असणारी रामायण-महाभारताची कथानकं आहेत, याचे भान जाणत्या संघटकांनी ठेवायला हवं.

@@AUTHORINFO_V1@@